Fake LinkedIn Job Scam: लिंक्डइन वर जॉब स्कॅम; ऑनलाईन जॉब शोधताना तुमची माहिती सुरक्षित कशी ठेवाल?

अनेक नोकरी शोधणारे LinkedIn सारख्या प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे स्कॅमरना त्यांची फसवणूक करणे सोपे होते.

Online Share Trading Scam | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नोकऱ्यांमधील स्कॅम वाढत असताना, सायबर गुन्हेगारांनी संशय नसलेल्या नोकरी शोधणाऱ्यांना फसवण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत. अलीकडील घोटाळ्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी लिंक्डइन आणि इतर जॉब प्लॅटफॉर्मवर बनावट जॉब लिस्ट पोस्ट केल्याचा समावेश आहे. हा घोटाळा, विशेषतः, Web3 आणि cryptocurrency space मध्ये नवीन नोकऱ्या शोधत असलेल्या व्यावसायिकांना उद्देशून केला जात आहे आणि तो LinkedIn आणि व्हिडिओ कॉलिंग ॲपद्वारे आयोजित केला जातो.

@IndianTechGuide on X नुसार, स्कॅमर्स अर्जदारांना आकर्षित करण्यासाठी बोगस जॉब पोस्टिंग तयार करतात. एकदा एखाद्या व्यक्तीने इंटरेस्ट दाखवल्यानंतर, स्कॅमर त्यांना मुलाखतीसाठी GrassCall नावाचे व्हिडिओ कॉल ॲप डाउनलोड करण्यास प्रवृत्त करतो. तथापि, GrassCall हे तुमच्या डिव्हाइसवरून बँक तपशील, वैयक्तिक फाइल्स आणि पासवर्डसह संवेदनशील माहिती चोरण्यासाठी डिझाइन केलेले malicious software आहे.

बनावट सूची अनेकदा व्यावसायिक आणि खात्रीशीर दिसतात, ज्यामुळे घोटाळ्यात पडण्याचा धोका वाढतो.

स्कॅम पासून सुरक्षित कसे रहाल?

  • जॉब लिस्टिंग व्हेरिफाय करा

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जॉब पोस्टिंगची क्रॉस-चेक करा किंवा रिक्त जागा निश्चित करण्यासाठी त्यांच्या एचआर विभागाशी संपर्क साधा.

  • अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करू नका

जर एखाद्या मुलाखतीसाठी विशिष्ट ॲप वापरण्याचा आग्रह धरत असेल तर सावध रहा. Microsoft Teams, Zoom किंवा Google Meet सारख्या विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर सहसा मुलाखती घेतल्या जातात.

  • सुरक्षेचा विचार करा

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सक्षम करा आणि तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचे पासवर्ड वेळोवेळी अपडेट करा.

  • तुमच्या अंतर्मनाचं ऐका

नोकरीच्या स्वरूपाकडे लक्ष ठेवा. काहीतरी संशयास्पद वाटत असल्यास, तेथून निघून जाणे चांगले.

जागरुक राहून, तुम्ही अशा घोटाळ्यांना बळी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. तुम्हाला एखादी संशयास्पद नोकरीचं लिस्टिंग किंवा ॲप रिक्वेस्ट आढळल्यास, लिंक्डइन किंवा संबंधित प्लॅटफॉर्मवर त्वरित त्याची तक्रार करा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now