EPFO (Photo Credits-Facebook)

कर्मचाऱ्यांना आता आपला PF खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजाची रक्कम पाहणं शक्य होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) ६ कोटीपेक्षा अधिक खातेदारांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केला आहे. तसेच अनेक खात्यांमध्ये २०१८-१९ च्या वर्षासाठी ८.६५ टक्के दराने व्याज जमा झाले आहे. २०१७-१८ या वर्षांत ८.५५ टक्के दराने व्याज जमा झाले आहे. तुम्हीही तुमचा PF घरबसल्या पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल. एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुमचा यूएएन, बँक खाते, पॅन (PAN) आणि आधार (AADHAR) लिंक असणे आवश्यक आहे. (हेही वाचा - नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी! PF सोबत कापण्यात येणाऱ्या पेन्शन काढण्याच्या नियमात बदल होण्याची शक्यता)

पीएफवरील व्याज तपासण्याची प्रक्रिया -

भविष्य निर्वाह निधी खात्यातील ऑनलाइन रक्कम काढण्यासाठी तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. तसेच एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुमचा यूएएन, बँक खाते, पॅन आणि आधार लिंक असणेही आवश्यक आहे.