घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे '5' सोपे पर्याय !
फक्त हवी क्रिएटीव्हीटी आणि थोडी मेहनत. हे आहेत ऑनलाईन पैसे कमावण्याचे सोपे पर्याय...
दररोज ऑफिसला जाण्याचा कंटाळा येतो? घरी बसून पैसे कमावण्याची इच्छा आहे? तर मग तुमची ही इच्छा पूर्ण होवू शकते. कारण आजकालच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणूकीची गरज नाही. फक्त हवी क्रिएटीव्हीटी आणि थोडी मेहनत. यामुळे तुम्ही घरबसल्या अगदी सहज पैसे कमावू शकता. तर जाणून घेऊया ऑनलाईन पैसे कमावण्याचे सोपे पर्याय...
ट्रान्सलेशन
जर तुम्हाला दोन-तीन भाषांचे उत्तम ज्ञान असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. या भाषांमध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत असल्यास ट्रान्सलेशनचा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या ज्ञानाचा वापर तुम्ही पैसे कमवण्यासाठी करु शकता. देशात आणि जगात अशा अनेक संस्था आहेत जिथे एका भाषेत लिहिलेली माहिती दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्याचे तुम्हाला पैसे मिळतात. अनेक वेबसाईट देखील आहेत जिथे तुम्हाला फ्रि लान्सिंगचा पर्याय उपलब्ध होईल. यांसारख्या वेबसाईट किंवा संस्थांसाठी तुम्ही काम करु शकता.
ब्लॉगिंग
लेखन ही तुमची आवड असेल तर तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता. यामुळे तुमची आवडही जोपासली जाईल आणि तुमची ओळखही निर्माण होईल. यासाठी तुम्हाला ब्लॉग किंवा वेबसाईट बनवावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार विविध विषयांवर आर्टिकल्स लिहू शकता. त्यानंतर तुम्ही गुगलच्या फिचर अॅडसन्सच्या माध्यमातून त्यावर जाहिरातीही घेऊ शकता. तुमचा ब्लॉग जितका अधिक वाचला जाईल तितकी तुमची जाहिरातीतून अधिक कमाई होईल.
युट्यूब
आजकाल घरबसल्या पैसे कमावण्याचा युट्युब हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. आजकाल अनेक तरुण-तरुणी युट्यूब व्हिडिओकडे करिअर ऑप्शन म्हणून बघतात. यातून तुम्ही लाखो-करोडो रुपये कमवू शकता. तुम्ही देखील हा पर्याय निवडू शकता.
यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करावा लागेल. त्याचबरोबर युट्यूब जाहिरातींसह तो मोनेटाईज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश करु शकता. वेबसाईटवर व्हिडिओ जितका अधिक बघितला जाईल तितकी तुमची कमाई अधिक होईल.
ऑनलाईन प्रॉडक्ट्स विकणे
घरातून ऑनलाईन प्रॉडक्ट्स विकून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट प्लॅटफॉर्मवर विक्रेता म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला प्रॉडक्ट्सची यादी पाहायला मिळेल.
खरेदी केलेले प्रॉडक्ट वेबसाईट कंपनीतील माणसे तुमच्याकडून घेणार आणि ग्राहकापर्यंत पोहचवणार. यामुळे तुम्ही स्वतः तयार केलेले प्रॉडक्ट्स तुम्ही वेबसाईटवर विकून पैसे कमावू शकता.
फेसबुक आणि इंस्टाग्राम
सोशल मीडिया हे उत्पन्नाचे एक उत्तम माध्यम आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरुन पैसे कमावण्यासाठी तुम्हाला फेसबुक-इंस्टा या दोघांवर एक वेगळे पेज बनवावे लागेल. या पेजला भरपूर लाईक्स असणे गरजेचे आहे. या लाईक्सच्या मदतीतून तुम्ही कंपनीची स्पोंसरशिप घेऊ शकता. एकदा तुम्हाला ही स्पोंसरशिप मिळाली की, तुम्ही त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स पेजवर प्रमोट करुन पैसे कमावू शकता.