COVID 19 Vaccine For Kids: 12-14 वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च पासून Corbevax लसीकरणाला होणार सुरूवात; जाणून घ्या CoWIN Portalवर कसं कराल रजिस्टर

Corbevax ही लस देखील लहान मुलांना दोन डोस मध्ये दिली जाणार आहे. 28 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.

Vaccine| Pixabay.com

भारतामध्ये किशोरवयीन मुलांनंतर आता कोविड 19 लसीकरणासाठी वयोमर्यादा 12 वर्षांपर्यंत खाली करण्यात आली आहे. नुकतीच केंद्र सरकारने 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोविड 19 ची प्रतिबंधात्मक लस दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. हैदराबादच्या Biological E'ची Corbevax ही लस 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी असणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत याची माहिती देताना ' जर मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित' अशा आशयाचं ट्वीट लसीकरण मोहिमेत आता 12 वर्षांवरील सार्‍यांचा समावेश होत असल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार ज्यांचा जन्म 2008, 2009, 2010 मध्ये झाला आहे त्यांना लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. या वयोगटातील देशात 7.11 कोटी मुलं आहेत. हे देखील नक्की वाचा: COVID 19 Vaccine For 12-14 Years Old: भारतामध्ये 15 वर्षांखालील मुलांना दिली जाणार केवळ Corbevax; जाणून घ्या या लसीची खासियत.

12-14 वयोगटातील मुलांसाठी कोविन अ‍ॅप वर कसं कराल रजिस्ट्रेशन?

  • www.cowin.gov.in या लिंकवरून कोविन अ‍ॅप ओपन करा.
  • तुमच्या मुलाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी “Register/Sign In” टॅब वर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा त्यावर तुम्हांला ओटीपी मिळेल.
  • पालकांनी पूर्वी त्यांनी घेतलेल्या लसीच्या डोस वेळेस रजिस्ट्रेशन केलेला नंबर वापरल्यास तुम्हांला उजव्या बाजुला Add Member वर क्लिक करावे लागेल. नवीन नंबर असेल तर थेट Add Member वर क्लिक करा.
  • मुलांच्या रजिस्ट्रेशन वेळेस काही कागदपत्र अपलोड करावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, स्कूल आयडी याचा समावेश केला जाऊ शकतो.
  • व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे स्लॉट बुकिंग करू शकाल.

Corbevax ही लस देखील लहान मुलांना दोन डोस मध्ये दिली जाणार आहे. 28 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. Biological E Ltd  कडून 5 कोटी डोस पुरवण्यात आले आहेत. केंद्राने त्याचे वाटप राज्यांना केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now