7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA मध्ये होणार 5 टक्के वाढ! जुलैपासून वाढणार कर्मचाऱ्यांचे पगार
सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते.
7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी (Central Government Employees) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही DA वाढण्याची वाट पाहत असाल तर ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 1 जुलै रोजी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार डीएमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. जर 5 टक्के वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगारात मोठी वाढ होईल.
एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. या आकडेवारीवरूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये किती वाढ होणार हे निश्चित होते. AICPI निर्देशांकानुसार, मार्च 2022 मध्ये यामध्ये वाढ झाली आहे, हे पाहता यावेळी कर्मचाऱ्यांना 5 टक्के वाढीव भत्ता मिळू शकतो, असं म्हटलं जात आहे. (हेही वाचा -Home Loan Interest Rates Hike: PNB, ICICI, BoB, BOI ने वाढवले गृहकर्जाचे व्याजदर; तुमच्या EMI वर होणार थेट परिणाम, येथे जाणून घ्या नवीन दर)
दरम्यान, सरकारने महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल. सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते.
सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. हा महागाई भत्ता सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो. ते देण्यामागचे कारण म्हणजे वाढत्या महागाईतही कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखले गेले पाहिजे.