घर बांधणे आजपासून झाले महाग! Home Loan वर मिळणार नाही 'ही' अतिरिक्त सवलत

याशिवाय गृहकर्जावर पूर्वीप्रमाणेच दोन मोठे डिडक्शन मिळत राहतील.

घर बांधणे आजपासून झाले महाग! Home Loan वर मिळणार नाही 'ही' अतिरिक्त सवलत
Home | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशातील नागरिकांना दिवसेदिवस महागाईला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत आता घर घेणे महाग झाले आहे. खरेतर, प्रथमच गृहखरेदी करणारे जे गृहकर्जाच्या (Home Loan) परतफेडीवर 3.50 लाखांच्या व्याजावर वार्षिक कर सवलतीचा लाभ घेत आहेत. त्यांना आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून धक्का बसणार आहे. केंद्र सरकार प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत अतिरिक्त कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे.

आजपासून तुम्हाला गृहकर्जावर 1.5 लाख रुपयांची ही अतिरिक्त सूट मिळणार नाही. कारण सरकारने ही कर सूट कालावधी वाढवली नाही. अर्थसंकल्प 2022 मध्ये, सरकारने या कर सवलतीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली नाही. यामुळे, गृहकर्जावरील या सवलतीचा लाभ नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये मिळणार नाही. घराच्या किमती परवडण्याजोग्या बनवण्यासाठी गृहकर्जावरील ही कर सवलत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध होती. (हेही वाचा - 1 एप्रिल पासून PF Account ते Cryptocurrencies च्या उत्पन्नावर कर, पहा नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी झालेले बदल)

दरम्यान, बजेट 2019 मध्ये, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कलम 80EEA अंतर्गत घराच्या किमती परवडण्यायोग्य बनवण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत आयकर लाभ वाढवला होता, ज्यामुळे घर खरेदीदारांना आयकर सूट मिळू शकेल. यानुसार, जर घराच्या मालमत्तेचे मुद्रांक शुल्क 45 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही गृहकर्जाच्या व्याजाच्या भरणामध्ये 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सूटचा दावा करू शकता.

याशिवाय गृहकर्जावर पूर्वीप्रमाणेच दोन मोठ्या कपाती मिळत राहतील. प्रथम, कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळत राहील. हे गृहकर्जाच्या व्याजावर उपलब्ध आहे. दुसरे, कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट देखील उपलब्ध राहील. ही वजावट गृहकर्जाच्या मूळ रकमेवर उपलब्ध आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2022 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).