Axis Bank च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! खात्यातून पैसे काढणे आणि SMS च्या शुल्कात वाढ
कारण बँकेने बचत खात्यामधील कॅश विड्रॉल आणि SMS शुल्क वाढवले आहेत.
जर तुम्ही एक्सिस बँकेचे (Axis Bank) ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँकेने बचत खात्यामधील कॅश विड्रॉल आणि SMS शुल्क वाढवले आहेत. पैसे काढण्यासंदर्भातील नवे शुल्क येत्या 1 मे 2021 पासून लागू होणार आहेत. तर एक्सिस बँकेने असे स्पष्ट केले आहे की, एका महिन्यात 4 वेळा ट्रान्जेक्शन किंवा 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढल्यास त्यावर कोणता शुल्क आकारत नाही. मात्र त्यानंतर पैसे काढल्यानंतर प्रति हजार 5 रुपये किंवा अधिकाधिक 150 रुपये वसूल करतात. मात्र आता बँकेने हे शुल्क 5 रुपयांहून 10 रुपये आणि अधिकाधिक शुल्क 150 रुपयेच ठेवला आहे.
बँक खात्यात ठेवल्या जाणाऱ्या कमीतकमी रक्कमेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. 1 मे पासून ग्राहकांना आपल्या खात्यात कमीतकमी 15 हजार रुपये रक्कम ठेवावी लागणार आहे. आतापर्यंत 10 रुपये रक्कम खात्यात ठेवावी लागत होती. याच प्रकारमे प्राइम आणि लिबर्टी बचत खात्यात सुद्धा कमीतकमी रक्कमेची सीमा 15 हजारांहून 25 हजार रुपये केली आहे.(LPG Cylinder Offer: पेटीएमची जबरसदस्त ऑफर! गॅस सिलिंडरवर थेट 800 रुपयांपर्यंत करा बचत, 30 एप्रिलपर्यंत घेता येणार लाभ)
एक्सिस बँकेच्या कमीतकमी महिन्यातील बॅलेन्स नसल्यास त्यावर 100 रुपयांवर 10 रुपयांचा दंड स्विकारला जातो. सध्या बँकेकडून हाच दंड 150 रुपये ते 600 रुपयांपर्यंत वसूल करणार आहे. मात्र 1 मे पासून यावर लागू करण्यात येणारा चार्ज हा कमी होऊन 50 रुपये होणार आहे. परंतु अधिकाधिक चार्ज वाढून 800 रुपये होणार आहे. म्हणजेच कमीतकमी बॅलेन्स न ठेवल्यास बँक 50 रुपये ते 800 रुपयांपर्यंत दंड स्विकारणार आहे. यामध्ये टॅक्स अतिरिक्त आहे.
तसेच एक्सिस बँकेच्या SMS साठी 5 रुपये प्रति महिना चार्ज लावला जातो. आता ग्राहकांकडून बँक 25 पैसे प्रति एसएमएस शुल्क आकारणार आहे. दरम्यान अधिकाधिक 25 रुपयेच घेतले जाणार आहेत. हे सुद्धा दर 1 मे पासून लागू होणार आहेत. यामध्ये बँकेकडून पाठवला जाणारा OTP आणि प्रमोशनल SMS चा समावेश नसणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राय कडून SMS संबंधी नव्या नियमांच्या कारणास्तव बदल केले आहेत. प्रिमियम खातेधारक, बँक स्टाफ, पेन्शन खातेधारक, स्मॉल अॅन्ड बेसिक अकाउंटसाठी SMS साठी लागू नसणार आहे.(Emirates कडून दुबई आणि भारतासाठी विमानसेवा येत्या 25 एप्रिल पासून 10 दिवसांसाठी रद्द, वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय)
एक्सिस बँकेच्या सॅलरी अकाउंटच्या नियमात सुद्धा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जर तुमचे सॅलरी अकाउंट 6 महिन्यांहून अधिक वेळ जुने किंवा एका महिन्यात कोणतेही क्रेडिट नाही झाल्यास तर प्रति महिना 100 रुपये चार्ज लावला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात 17 महिन्यांपर्यंत कोणतेही ट्रान्जेक्शन न झाल्यास तर 18 व्या महिन्यात वन टाइम 100 रुपयांचा चार्ज वसूल केला जाणार आहे.