सावधान! ऑक्सिजनच्या नावाखाली नागरिकांची सोशल मीडियात फसवणूक, तुम्ही सुद्धा बळी पडू शकता

अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स किंवा औषधांसाठी वणवण करावी लागत आहे. या परिस्थितीवर सरकारकडून नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Oxygen Cylinder (Photo Credits: (Wikimedia Commons)

देशात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव तुफान वाढला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स किंवा औषधांसाठी वणवण करावी लागत आहे. या परिस्थितीवर सरकारकडून नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तरीही परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे दिसून येत नाही आहे. ऐवढेच नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन नातेवाईक घेऊन जात आहेत.(Oxygen Shortage: ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले; 'ही दुसरी 'लाट' नाही तर ही 'Tsunami' आहे, आम्ही काय तयारी केली आहे?)

रुग्णांच्या नातेवाईकांकडून या सर्व गोष्टींची पुर्तता व्हावी यासाठी सोशल मीडियात मदतीची मागणी केली जात आहे. त्याचसोबत संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी काही संस्था आणि लोक सुद्धा पुढे येत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हे मदतीचे माध्यम जरुर ठरु शकते. मात्र काही जण सध्याच्या परिस्थितीत सुद्धा नागरिकांची फसवणूक करण्यामागे पडले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा एखादा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

तुम्ही जर तुमच्या रुग्णासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेडिकल रिसोर्रेज शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर सावध व्हा. कारण काही फसवणूकदारांकडून लोकांना लुटण्यााच प्रयत्न केला जात आहे. अशाच पद्धतीने ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन कंसनट्रेटर संबंधिक एक प्रकरण पत्रकार पंकज कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

Tweet:

खरंतर MrRajpal Oxygendelivery नावाचे एक पेज फेसबुकवर आहे. येथे असे लिहिण्यात आले आहे की, ऑक्सिजन कंसनट्रेटर एजेंसी असून संपूर्ण भारतात त्याची डिलिव्हरी करतात. त्याचसोबत त्यांचा संपर्क क्रमांक ही दिला गेला आहे. तसेच असे ही लिहिण्यात आले आहे की, ही एक सरकारी एजेंसी आहे. या पेजवर स्टॉक फुल झाल्याची सुद्धा माहिती दिली गेली आहे.(Rahul Gandhi on Central Government: PR, अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याऐवजी Corona Vaccine, ऑक्सीजन पुरवठ्याकडे लक्ष द्या; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सल्ला)

पंकज कुमार यांनी काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, फेसबुकवरील या पेजवर एका व्यक्तीला ऑक्सिजन सिंलिंडरसाठी संपर्क करण्यात आला आहे. तसेच त्यांनी सर्व माहिती डिटेल घेतल्यानंतर ही प्रथम पैसे देण्यास सांगितले असून त्यानंतरच डिलिव्हरी दिली जाईल असे म्हटले आहे. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क करुन दिल्लीतील एका ठिकाणी ऑक्सिनज देण्यासाठी सांगितले आहे. कॉलवरील व्यक्तीने ते संपूर्ण भारतात ऑक्सिजनचा पुरवठा करतात असे म्हटले आहे. मात्र प्रथम अकाउंट डिटेल्स द्या त्यानंतर आम्ही सिलिंडर तुमच्या पत्त्यावर देऊ असे म्हटले आहे.

कॉलवरील व्यक्तीने असे ही म्हटले की, आमच्या एका लिंकवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. प्रथम लिंक मागितल्यास नकार दिला आणि सरकारी एजेंसीचे नाव सांगण्यास ही त्यांनी चूकचूक केली. फक्त पैसे देण्याबद्दलच बोलत होते. त्यांना असे ही सांगितले की, डिलिव्हरी केल्यानंतर पैसे देतो मात्र त्यासाठी त्यांनी पूर्णपणे नकार दिला.

त्याचसोबत फेसबुक पेजवर ज्या नावाने कंपनी आहे ती गुगल पे वर सुद्धा नाही आहे. फेसबुकवर कोणताही पत्ता दिलेला नाही. पेज काही वेळापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की लोकांची फसवणूक करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा गरजेच्या वस्तूंसाठी सोशल मीडियाची मदत घेताना सावधगिरी बाळगा. अन्यथा तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते.