चक्क OLX वर विक्रीला आहे अमिताभ बच्चन यांची मर्सिडीज कार; किंमत फक्त 9.99 लाख; जाणून घ्या इतर माहिती

मात्र आता अमिताभ बच्चन यांची Mercedes-Benz S-Class विकायला काढली आहे. आश्चर्य म्हणजे ही गाडी चक्क OLX वर फक्त 9.99 लाख रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.

अमिताभ बच्चन (संग्रहित-संपादित प्रतिमा)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा गाडीचा शौक जगजाहीर आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये अनेक महागड्या गाड्या सामील होत राहतात. अशावेळी त्यांच्या जुन्या गाड्यांचे काय होत असावे? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याआधी काही वेळा, अमिताभ बच्चन यांनी वापरलेल्या गाड्या विकत घेण्याचे भाग्य काही चाहत्यांना लाभले होते. मात्र आता अमिताभ बच्चन यांची  Mercedes-Benz S-Class विकायला काढली आहे. आश्चर्य म्हणजे ही गाडी चक्क OLX वर फक्त 9.99 लाख रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.

OLX  पोर्टलवर 2007 साली बनलेली एक मर्सिडीज विक्रीसाठी उपलब्ध आहे. सांगितले जात आहे की ही गाडी कधीकाळी बच्चन कुटुंबीय वापरत होते. मात्र यात कितपत सत्य आहे ते देव जाणो. याबाबत बच्चन परिवाराकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. OLX वर जाहिरात देण्यात आलेल्या या गाडीचा मालक हा 3rd ओनर आहे. ही कार खरोखर अमिताभच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीजसारखी आहे. यावर असणारा गाडी क्रमांकही त्यांचा आवडता क्रमांक 5050 असा आहे. OLX वर उपलब्ध असणाऱ्या या गाडीचे 55000 किलोमीटर रनिंग झाले आहे.

(हेही वाचा: अमिताभ बच्चन यांचे ट्वीटर हॅक केल्याप्रकरणी पाकिस्तानचा बदला, 5 वेबसाईटसवर झळकवला भारताचा तिरंगा)

याआधी अनेकवेळा अमिताभ बच्चन यांचे अगदी अशाच गाडीसोबतचे फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान, सध्या अमिताभ बच्चन यांच्याकडे Lexus LX570, Mercedes-Maybach S500, Bentley Continental GT, Porsche Cayman, S-Class, Mercedes-Benz V-Class आणि Land Rover Range Rover यांसारख्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे आधी लँड क्रुझर आणि रॉल्स रॉयस यांसारख्या गाड्यादेखील होत्या.