आता तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) रजिस्टर नसला तरीही UIDAI website वरून आधार कार्ड (Aadhaar Card) डाऊनलोड करण्याची सुविधा खुली करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांना असं वाटत होते की मोबाईल नंबर शिवाय आधारकार्ड डाऊनलोड करता येणार नाही. पण आता मोबाईल नंबर रजिस्टर नसलेल्यांसाठी प्रक्रिया सुकर आणि सोपी करण्यात आली आहे. आशार सएवा अशांसाठी पण उपलब्ध आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. आता रजिस्टर मोबाईल नंबर वरून एसएमएस (SMS) पाठवून देखील ऑफलाईन सोय करण्यात आली आहे.
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा ओळखपत्राचा पुरावा आहे. तो 'डिजिटल इंडिया'चा एक महत्त्वाचा भाग आहे. सरकारच्या सबसिडीज मिळवण्यासाठी ग्राह्य आधारकार्ड भारतीयांकडे असणं आवश्यक ते भारतात कुठेही ग्राह्य धरलं जातं. नक्की वाचा: Aadhaar Card अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रं आवश्यक; पहा संपूर्ण यादी.
रजिस्टर मोबाईल नंबर शिवाय कसं डाऊनलोड कराल आधार कार्ड
- UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
- होम पेजवर ‘My Aadhaar’ मधील ‘Order Aadhaar Reprint’ वर क्लिक करा.
- त्यानंतर 12th digit Aadhaar number/Unique Identification Number/UID/16-digit Virtual Identification Number/VID टाका.
- ‘My Mobile number is not registered’ या चेक बॉक्सवर टीक करा.
- आता रजिस्टर नसलेला मोबाईल नंबर किंवा पर्यायी मोबाईल नंबर एंटर करा.
- ‘Send OTP’वर क्लिक करा. 'terms and condition’ वर क्लिक करा त्यानंतर सबमीट वर क्लिक केल्यानंतर तुमची ओटीपी ऑथंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.
- पुढील व्हेरिफिकेशनसाठी ’Preview Aadhaar Letter' चा पर्याय निवडा. ‘Make payment’ वर क्लिक करा.
- पेमेंट झाल्यानंतर डिजिटल सिंग्नेचर द्वारा आधारकार्ड डाऊनलोड करता येऊ शकतं.
- एसएमएस द्वारा सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर दिला जातो.
- आधार्ड कार्ड डिस्पॅच होईपर्यंत SRN status तुम्ही पाहू शकता.सध्या सीम कार्ड पासून अगदी बॅंक अकाऊंट्स पर्यंत आणि रेशन कार्ड पासून पॅन कार्ड पर्यंत तुमचं आधार कार्ड लिंक करण्याचं आवाहन सरकारने केले आहे. आधार कार्ड वर प्रत्येक भारतीयाला एक 12 अंकी युनिक आधारकार्ड नंबर दिला जातो.