Atal Pension Yojana: सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा मोठा फायदा; 42 रुपये जमा केल्यानंतर मिळतील 12,000 रुपये
फेब्रुवारी 2021 अखेर खातेदारांची संख्या 22 टक्क्यांनी वाढून 4.15 कोटी झाली आहे.
Atal Pension Yojana: केंद्र सरकार जनतेसाठी अनेक योजना आखत असते. त्यापैकी एक अटल पेन्शन योजना. (Atal Pension Yojana) ही भविष्यासाठी अतिशय प्रभावी योजना आहे. या योजनेत सरकार एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शन देते. अटल पेन्शन योजनेत, वय वर्ष 60 च्या नंतर प्राप्त होते. ही योजना वेगवेगळ्या आधारावर विभागली गेली आहे. ग्राहक त्यांना पाहिजे असलेल्या पेन्शननुसार हप्ते भरू शकतात.
अटल पेन्शन योजना पोस्ट ऑफिस आणि बँक शाखेत जाऊन उघडता येते. आपल्याकडे आधीपासूनच बचत खाते नसल्यास आपण नवीन खाते उघडू शकता. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत क्रमांक दर्शवा आणि कर्मचार्यांच्या मदतीने एपीवाय नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर मासिक, त्रैमासिक आणि सहामाही योगदानासाठी आवश्यक रक्कम सुनिश्चित करा. या योजनेतील योगदानाची रक्कम महिन्याच्या कोणत्याही तारखेस बचत खाते किंवा टपाल कार्यालय बचत खात्यातून दिली जाऊ शकते. (वाचा - EPFO Tips: नोकरी सोडल्यानंतर पीएफ ची Date of Exit ऑनलाईन पद्धतीने कशी अपडेट कराल?)
तुम्हाला किती पेन्शन मिळेल?
अटल निवृत्तीवेतन योजनेत 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 12 हजार रुपये मिळवण्यासाठी दरमहा 42 रुपये जमा करावे लागतात. पाच हजार रुपयांच्या पेन्शनसाठी 210 रुपये वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत जमा करावे लागतील. 40 वर्षांच्या व्यक्तीस एक हजार रुपये पेन्शनसाठी 291 रुपये आणि पाच हजार रुपयांच्या पेन्शनसाठी 1454 रुपये जमा करावे लागतील.
खातेदारांच्या संख्येत वाढ -
अटल पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टमच्या खातेदारांची संख्या वाढली आहे. फेब्रुवारी 2021 अखेर खातेदारांची संख्या 22 टक्क्यांनी वाढून 4.15 कोटी झाली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानुसार, फेब्रुवारीपर्यंत विविध योजनांमध्ये खातेदारांची संख्या सन 2020 मध्ये 3.43 कोटी होती, जी आता वाढून 4.14 कोटी झाली आहे.