Free LPG Cylinders: सणासुदीच्या काळात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 1 लाख 84 हजार प्रधानमंत्री उज्ज्वला लाभार्थ्यांना मिळणार मोफत LPG सिलिंडर
ग्राहकांना सुरुवातीला गॅस सिलिंडरची संपूर्ण किंमत आगाऊ भरावी लागेल. त्यानंतर इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात तीन ते चार दिवसांत जमा केली जाईल.
Free LPG Cylinders: सणासुदीच्या काळामध्ये केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) 184,039 लाभार्थ्यांना मोफत LPG सिलिंडर (Free LPG Cylinders) देणार आहे. ग्राहकांना सुरुवातीला गॅस सिलिंडरची संपूर्ण किंमत आगाऊ भरावी लागेल. त्यानंतर इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात तीन ते चार दिवसांत जमा केली जाईल. या योजनेचा लाभ केवळ आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एकूण 219,667 ग्राहक नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 184,039 ग्राहकांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
तथापि, 35,628 ग्राहकांनी अद्याप केवायसी केलेली नाही. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी (DSO) यांनी सर्व गॅस एजन्सींना लाभार्थ्यांसाठी 100% आधार प्रमाणीकरण सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने होळी आणि दिवाळीच्या सणात दोन वेळा मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना आखली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागेल आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. (हेही वाचा - LPG Cylinder Price Hike: एलपीजी सिलिंडर महागला; सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामांन्यांचा महागाईचा फटका)
दरम्यान, ज्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडलेली आहेत आणि ज्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे तेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत 14.2 किलोचा सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. डीएसओ शिवी गर्ग यांनी सांगितले की, ग्राहकांना या समस्येबद्दल जागरूक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना मोफत LPG सिलिंडर जोडणी देण्याचा होता. (हेही वाचा - LPG Cylinder Found on Railway Tracks in Kanpur: उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळला गॅस सिलिंडर)
वर्षभर एलपीजी गॅसचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. याव्यतिरिक्त, गॅस कनेक्शनशी संबंधित इतर आवश्यक वस्तूंच्या खर्चासाठी 1,600 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली जाते. गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी सरकार EMI सुविधा देखील प्रदान करते.