7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा यंदाचा दसरा मालामाल; वाढणार पगार, मिळणार एक आकर्षक भेट
या वर्षी जानेवारी (2019) मध्ये भत्यात वाढ केली होती. परंतू ही वाढ अद्याप प्रत्यक्षात लागू झाली नाही. DA कॅल्क्युलेशन AICPI इंडेक्सच्या आकडेवारीनुसार होते. या वेळी DA 5 टक्क्यांनी वाढवला जाणार असे गृहीत धरले जात आहे.
7th Pay Commission: 'दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा' ही म्हण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदा वास्तवात उतरणार असे दिसते. येणाऱ्या दसऱ्यापूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना आपला वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळू शकतो. हा वाढीव DA म्हणजे सातव्या वेतन आयोगाने सूचवलेल्या शिफारशींनुसार वेतनामध्ये सुधारणा करण्याची मागणी लाऊन धरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा असेल. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा DA नुकताच 12 टक्के इतकाच निश्चित करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की तो आणिखी पाच टक्क्यांनी वाढवावा.
डीएमध्ये सर्वसाधारण किती फायदा होऊ शकतो?
(सर्व आकडे 5% DA वाढीच्या अंदाजानुसार)
लेवल सर्वसाधारण वेतन वाढ (रुपयांमध्ये)
लेवल 1 18000 900
लेवल 2 19900 995
लेवल 3 21700 1085
लेवल 4 25500 1275
लेवल 5 29200 1460
कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्याबाबत सरकार प्रति सहामहिन्यांनी म्हणजेच वर्षातून दोनदा आढावा घेते. या वर्षी जानेवारी (2019) मध्ये भत्यात वाढ केली होती. परंतू ही वाढ अद्याप प्रत्यक्षात लागू झाली नाही. DA कॅल्क्युलेशन AICPI इंडेक्सच्या आकडेवारीनुसार होते. या वेळी DA 5 टक्क्यांनी वाढवला जाणार असे गृहीत धरले जात आहे. (हेही वाचा, डिजिटल बँकिंगला केंद्र सरकारचे प्रोत्साहन, यापुढे वर्षाला दहा लाखाची रक्कम काढल्यास भरावा लागणार कर)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा वाढीव डीए येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दसऱ्याच्या आगोदर दिला जाऊ शकतो. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एरिअरही मिळले.