indian railways: फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वे मालामाल, दंडवसुलीत मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांची वाढ

मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या दंड वसूलीचा आकडा हा सगळ्यांना धक्का देणारा आहे. गेल्या १० महिन्यांत रेल्वेने १५७.१२ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या कालावधीत दंडवसुलीच्या रकमेत मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Indian Railway | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

indian railways: भारतात वाहतुकीसाठी सर्वात स्वस्त आणि सुरक्षित साधन म्हणून रेल्वेची ( indian railway ) ओळख आहे. त्यातच नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारतमुळे रेल्वेची सेकंड जनरेशन सुरु झाली आहे. ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस पडत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशी (passengers) वाढले आहेत. फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या तिजोरीत तब्बल १५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी स्थानक, पुलांवर फोर्टेस तिकीट तपासणीसह रेल्वेगाड्यांमध्येही तिकीट तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मोहिमेच्या जोरावर गेल्या दहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १५७ कोटी रुपयांचा दंड वसूल (railway fine) केला आहे. (हेही वाचा:Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)

फेब्रुवारी महिन्यात मुंबई उपनगरी विभागांत सुमारे १.०२ लाख प्रवासी विनातिकीट आढळून आले. उन्हाचा तडाका वाढल्याने वातानुकूलित लोकलमध्ये ही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाने ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ५६ हजार अधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहे. यामुळे दंडवसुलीच्या रकमेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (हेही वाचा:Indian Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास झालेल्यांसाठी 6891 पदांची भरती)

गेल्या १० महिन्यांत रेल्वेने १५७.१२ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या कालावधीत दंडवसुलीच्या रक्कमेत मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे १.०२ लाख विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी १२ मार्चला रेल्वेच्या वेगवेगळ्या कामांच लोकार्पण होणार आहे. शिवाय ९०० हून अधिक कामांच भूमीपूजन होणार आहे. महाराष्ट्रातील ५०० ठिकाणीच लोकार्पण तसेच भूमीपूजन होणार आहे. पुण्यात लातूरला महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. आता ट्रेनची संख्याही वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कलबूर्गी स्टेशन ते विश्वेस्वरया टर्मिनस अशी आणखी एक वंदे भारत सुरु होणार आहे.