MiG-29K Crash: मिग-29 के चे वैमानिक कंमाडर निशांत सिंह यांचा मृतदेह 11 दिवसांनी अरबी समुद्रात सापडला
भारतीय नौदलाचे मिग-29के प्रशिक्षक विमान 26 नोव्हेंबरला 5 वाजता दुर्घटनाग्रस्त झाले होते.
मिग-29 के (MiG-29K) मधील वैमानिक निशांत सिंह (Nishant Singh) यांचा मृतदेह अखेर 11 दिवसांनी अरबी समुद्रात (Arabian Sea) सापडला आहे. भारतीय नौदलाचे मिग-29के प्रशिक्षक विमान 26 नोव्हेंबरला 5 वाजता दुर्घटनाग्रस्त झाले होते. भारतीय नौदलाकडून सातत्याने आपल्या बेपत्ता वैमानिकाचा शोध सुरु होता. भारतीय नौदलाचे मिग-29 के विमान मागच्या आठवड्यात उड्डाण करत असताना कोसळले होते. या विमानात दोन वैमानिक होते. त्यातील एकाला वैमानिकाला वाचवण्यात रेस्क्यू पथकाला यश आले होते. मात्र, निशांत सिंह यांचा शोध लागला नव्हता.
विमान समुद्रात कोसळ्यानंतर बेपत्ता वैमानिकाला शोधण्यासाठी नौदलाने 9 वॉरशिप, 14 एअरक्राफ्ट समुद्रातील त्याठिकाणी कामाला लावली असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हेतर, निशांत सिंग यांना शोधण्यासाठी मरीन व कोस्टल पोलीसांची मदत घेण्यात येत होती. त्यानंतर तब्बल 11 दिवसांनी त्यांचा शोध लागला आहे. हे देखील वाचा- Indian Economy: पुढील वर्षी भारतीय कंपन्यांसाठी व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील; Moody's ने वर्तवले सकारात्मक भविष्य
एएनआयचे ट्विट-
मिग-29 विमाने याआधीही अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. पंजाबमधील नवाशहर येथे 8 मे 2020 रोजी नौदलाचे लढाऊ विमान मिग-29 तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले होते. तर, 23 फेब्रुवारी 2020 रोजी गोव्यात मिग-29 दुर्घटनाग्रस्त झाले होते. मात्र, या दोन्ही दुर्घनटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.