India Vs South Africa: बंगळरु येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात सट्टाबाजी करणाऱ्या दोघांना अटक, 41 लाखांची रोकड जप्त
दरम्यान केंद्रीय गुन्हे शाखेला आरोपींकडून लाखों रुपयांची रोकड मिळाली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका (India Vs South Africa) यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्या दरम्यान केंद्रीय गुन्हे शाखाने (Central Crime Branch) बंगळरु (Bengaluru) येथे सट्टाबाजी (Betting) करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दरम्यान केंद्रीय गुन्हे शाखेला आरोपींकडून लाखों रुपयांची रोकड मिळाली आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट सामना दरम्यान अनेक ठिकाणी सट्टाबाजी केली जाते. हा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय गुन्हे शाखा अधिक प्रयत्न करत आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात रविवारी तिसरा टी-20 सामना पार पडला आहे. या सामन्या दरम्यान सट्टाबाजी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहेत. अद्याप या आरोपींचे नावे कळाले नसून हे दोघेही बंगळरू येथील रहवासी आहेत. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या सामन्या दरम्यान बंगळरू येथे सट्टाबाजी चालू असल्याची माहीती केंद्रीय गुन्हे शाखा यांना मिळाली होती. केंद्रीय गुन्हे शाखाने वेळ न घालवता संबधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सट्टाबाजी केल्या जाणाऱ्या ठिकाणी तब्बल 41 लाखांची रोकड मिळाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हे देखील वाचा-माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन; सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, मोहम्मद कैफ, वसीम जाफर, यांच्यासह दिग्गजांकडून खास ट्वीट च्या माध्यमातून श्रद्धांजली
ANI चे ट्वीट-
याआधीही जून महिन्यात सट्टाबाजी प्रकरणी पोलिसांनी हैदराबाद येथून 6 जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून 8 लाखांची रोकड जप्त केली होती. सट्टाबाजीसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय गुन्हे शाखा पुरेसे प्रयत्न करत आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.