Vice President Salary: भारताच्या उपराष्ट्रपतींना किती मिळतो पगार? कोणत्या सुविधांचा आहे हक्क, घ्या जाणून

उपाध्यक्षांना पगार मिळत नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात, त्यामुळे त्यांना सभापतींचा पगार आणि सुविधा दिल्या जातात.

Parliament building (Photo Credits: Twitter)

भाजपने (BJP) शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून नामांकित केले. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी एनडीएचे (NDA) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून 71 वर्षीय जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार विरोधकांनी जाहीर केला आहे. विरोधी पक्षांनी मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुख्यता आता सगळ्याना प्रश्न असेल की भारताच्या उपराष्ट्रपतींना किती पगार आणि कोणत्या सुविधा मिळतात? तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. देशाच्या उपराष्ट्रपतींचा 'पगार आणि संसद अधिकारी कायदा, 1953' अंतर्गत निर्धारित केला जातो. उपराष्ट्रपतींना पगार मिळत नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात, त्यामुळे त्यांना सभापतींचा पगार आणि सुविधा दिल्या जातात.

उपराष्ट्रपतींना किती मिळतो पगार?

माहितीनुसार, उपराष्ट्रपतींना दरमहा 4 लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय त्यांना अनेक प्रकारचे भत्तेही मिळतात. उपराष्ट्रपतींना दैनंदिन भत्ता, मोफत निवास, वैद्यकीय, प्रवास आणि इतर सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. उपराष्ट्रपतींना वेतनाच्या 50% पेन्शन असते.

जगदीप धनखर उपराष्ट्रपती होणार का?

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य देशाच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी मतदान करतात. संसदेचे सध्याचे संख्याबळ 780 आहे, त्यात भाजपचे 394 खासदार आहेत. विजयासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत जगदीप धनखर हे देशाचे पुढील उपराष्ट्रपती होतील, असे मानले जात आहे. (हे देखील वाचा: Vice President Candidate: शेतकऱ्याच्या मुलापासून ते राज्यपालापर्यंतचा प्रवास, जाणून घ्या कोण आहेत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर)

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कधी?

भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 5 जुलै रोजी अधिसूचना जारी केली होती. 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून 19 जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif