Bengaluru: ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्यानंतर हॉस्टेल वॉर्डनने केले स्वतःचेचं अपहरण; बनाव वास्तविक दिसण्यासाठी वापरले टोमॅटो केचप

जीवनने याआधी ऑनलाइन जुगारात 2 लाखांहून अधिक रुपये गमावले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याच्यापासून दुरावले होते. त्याची काकू सुनंदा हिने त्याला आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याला वॉर्डनची नोकरी मिळवून दिली. तथापि, जीवनने पुन्हा जुगार खेळण्यास सुरुवात केली आणि आणखी पैसे गमावले.

Kidnaping | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bengaluru: ऑनलाइन जुगारात लाखो रुपये गमावलेल्या 24 वर्षीय हॉस्टेल वॉर्डन (Hostel Warden) ने पैसे कमवण्यासाठी आपल्या अपहरणाचा कट रचला. जीवन असं या आरोपीचं नाव आहे. विषेश म्हणजे जीवनने त्याचे अपहरण खरे दिसावे म्हणून आपल्या तीन साथीदारांसह डोक्यावर टोमॅटो केचप (Tomato Ketchup) ओतले. यानंतर फोटो काढून तो त्याच्या चुलतीला पाठवला. TOI च्या वृत्तानुसार, आरोपीच्या योजनेवर सुरुवातीला त्याच्या चुलतीला विश्वास बसला. त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या खात्यात 27,000 रुपये जमा करण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींना खूप आनंद झाला. ही घटना लवकरच उघड झाली असली तरी चार आरोपींनी एका खोलीत आनंद साजरा केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

सुरुवातीला हे अपहरणाचे खरे प्रकरण असल्याचा पोलिसांचा विश्वास होता. पण नंतर त्यांना कळले की जीवनने स्वतःचे अपहरण केले आहे. जीवन हा हसनचा रहिवासी आहे आणि सध्या बोमनहल्ली येथे राहतो. खाजगी महाविद्यालयाच्या वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम करतो. त्याचे साथीदार विनय कुमार, पूर्णेश उर्फ ​​प्रीतम आणि राजू हे तिघेही 20 वर्षांचे असून शहरात विविध नोकऱ्या करतात. (हेही वाचा -Gurugram Shocker: एग करी बनवण्यास नकार दिल्याने लिव्ह-इन पार्टनरची हातोड्याने मारहाण करून हत्या; गुरुग्राममधील हृदयद्रावक घटना)

जीवनने याआधी ऑनलाइन जुगारात 2 लाखांहून अधिक रुपये गमावले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याच्यापासून दुरावले होते. त्याची काकू सुनंदा हिने त्याला आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याला वॉर्डनची नोकरी मिळवून दिली. तथापि, जीवनने पुन्हा जुगार खेळण्यास सुरुवात केली आणि आणखी पैसे गमावले. (हेही वाचा -Mob Attacks Foreign Students: गुजरात विद्यापीठात रमजान तरावीहची नमाज अदा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला, पहा व्हिडिओ)

कॉलेजमध्ये झालेल्या भांडणानंतर उपचारासाठी पैसे आवश्यक असल्याचे सांगून त्याने आपल्या काकूला 37,000 रुपये देण्यास भाग पाडले. हे पैसे जुगारात गमावल्यानंतर, जीवन आपल्या काकूकडून आणखी पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा कट रचण्याचा निर्णय घेतला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement