Agra Shopping Mall Accident Video: शॉपिंग मॉलमध्ये पार्किंग परिसरात चिमुकल्या मुलीचा भीषण अपघात, आग्रा येथील घटना
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई वडिलांच्या दुर्लक्षामुळे चिमुकल्या मुलीने अपघातात प्राण गमावले आहे.
Agra Shopping Mall Accident Video: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) शहरातील एका मॉलमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई वडिलांच्या दुर्लक्षामुळे चिमुकल्या मुलीने अपघातात प्राण गमावले आहे. हा अपघात मॉलमधील पार्किंग परिसरात झाला आहे. कार थेट चिमुकल्या मुलीच्या अंगावर घातली. ( हेही वाचा- पश्चिम बंगालमधील बागडोग्रा येथे भीषण रस्ता अपघात; 6 जणांचा मृत्यू, 2 जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, आग्राच्या कॉसमॉस मॉलमध्ये हा अपघात घडला. मॉलमध्ये शॉपिंगसाठी आलेल्या एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. शॉपिंग करून घरी परतत असताना हा अपघात घडला. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि आई वडिलांच्या दुर्लक्षतेमुळे दीड वर्षाच्या मुलीने अपघातात प्राण गमावले. ही घटना ६ ऑगस्ट रोजी घडली.
कसा घडला अपघात
पार्किंग परिसरात एक जोडपे शॉपिंग केल्यानंतर सामानांची यादी पाहत होते. त्यांची चिमुकली मुलगी पार्किंग परिसरात मुक्तपणे खेळत होती. त्याच दरम्यान मागच्या बाजूला असलेल्या एका कार चालकाने बाहेर लक्ष न देता कार चालवण्यास सुरुवात केली. कार रिव्हर्स केली आणि पुढे नेली त्यामुळे चिमुकली मुलगी मागच्या बाजूच्या चाकाखाली आली.
ती मागच्या बाजूला असल्यामुळे कार चालकाला दिसली नाही. चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आईने घटनास्थळी धाव घेतली. मुलीला चाकाखालून बाहेर काढले. अपघातानंतर परिसरात गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येत आहे. थरकाप उडवणारा या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.