Himachal Pradesh : शाळेच्या बसला अपघात, 35 विद्यार्थ्यांना दुखापत

हिमाचल प्रदेशात धर्मशाला येथून निघालेल्या एका शाळेचा बसला अपघात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

हिमाचल प्रदेशात धर्मशाला येथून निघालेल्या एका शाळेचा बसला अपघात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. या अपघातात शाळेच्या 35 विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे.

भाजप (BJP) सरकारला हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळेची बस ही मोदींच्या रॅलीत सहभागी होण्यासाठीच निघाली होती. परंतु रस्त्यामध्ये शाळेच्या या बसला अपघात झाला आहे.

नगरोटा सुरिया भागातील कॉम्प्युटर सेंटरच्या स्किल डेव्हल्पमेंटचे विद्यार्थी या बसमध्ये होते. बस चालकाचा कांगरा भागातील लुंज येथे बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. तर जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.