UP Viral Video: गार्डन गॅलिरेया मॉलमध्ये दोन गटात हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तरुणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केले आहे.

up fighting viral video pc twitter

UP Viral Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा येथील गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये दोन गटात  जोरदार भांडण झाले आहे. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही गटातील तरुणांनी एकनेकांना मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तरुणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केले आहे. भांडणात एक महिला देखील आहे. ही घटना कोणत्या दिवशी घडली हे अद्याप समोर आले आहे. नोएडा येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकामध्ये घबराट निर्माण होत आहे. ( हेही वाचा- लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; मोहालीतील धक्कादायक घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या गार्डन मॉलमध्ये दोन गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मारामारी पाहण्यासाठी मॉलमध्ये उपस्थिल लोकांनी गर्दी केली आहे. भांडण सोडवण्यासाठी अनेक लोकांनी मद्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, दारूच्या नशेत दोन गटात वाद झाल्याचे सांगत आहे. या वादाचे रुपांतर थेट मारामारी पर्यंत पोहचेले आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस या घटनेची पुढील चौकशी करत आहे. मारमारीच्या घटनेनंतर मॉल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, मॉलचे व्यवस्थापन भांडण लपवून आपली प्रतिष्ठी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मॉलमधून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नोएडा येथील गॉर्डन गॅलेरिया मॉलमध्ये असलेल्या एफ बार आणि लाउंजमध्ये भांडण झाले आहे. एका गटाने एका व्यक्तीला क्रूरपणे मारल्यानंतर त्याचा खून करण्यात आला आहे.  बारमधून लोकांना अवैध दारूचा पुरवठा होत असल्याचा दावा केला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif