Gujarat Shocker: गुजरातमध्ये 11 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार, आरोपीला अटक
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सोमवारी एका 36 वर्षीय आरोपीला अटक केली, जो मूळचा झारखंडचा आहे. पोलीस उपअधीक्षक कुशल ओझा यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहत होता.
Gujarat Shocker: गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात सोमवारी एका 11 वर्षीय मुलीचे घराजवळून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका मजुराला अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सोमवारी एका 36 वर्षीय आरोपीला अटक केली, जो मूळचा झारखंडचा आहे. पोलीस उपअधीक्षक कुशल ओझा यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. मुलीचे वडील ज्या कारखान्यात काम करतात तिथे आरोपीही त्याच्यासोबत काम करत असे. त्यांनी सांगितले की, लैंगिक अत्याचारामुळे मुलीला गंभीर अंतर्गत दुखापत झाली असून तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला वडोदरा येथील एसएसजी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ओझा म्हणाले, “आरोपीने मुलीचे अपहरण केले तेव्हा ती तिच्या घराजवळ खेळत होती. हे देखील वाचा: Delhi Shocker: तरुणाला दुसऱ्याच्या पत्नीसोबत पकडल्याच्या कारणावरून नराधमाला बेदम मारहाण
जाणून घ्या, संपूर्ण घटना
आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. "बलात्कार, अपहरण आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्याला अटक करण्यात आली आहे."