Chinese Visa Scam Case: काँग्रेस खासदार Karti Chidambaram यांना मोठा दिलासा! CBI न्यायालयाने 30 मेपर्यंत दिली अटकेला स्थगिती
चायनीज व्हिसा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम (Congress MP Karti Chidambaram) यांना अटकेतून अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने हे अंतरिम संरक्षण 30 मे पर्यंत दिले आहे.
Chinese Visa Scam Case: चायनीज व्हिसा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम (Congress MP Karti Chidambaram) यांना अटकेतून अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने हे अंतरिम संरक्षण 30 मे पर्यंत दिले आहे. व्हिसा मिळवण्यासाठी 263 चिनी नागरिकांना फसवल्याचा आरोप काँग्रेस नेत्यावर आहे. त्यांचे वडील पी चिदंबरम (P Chidambaram) गृहमंत्री असताना हा कथित घोटाळा झाला होता.
कार्ती चिदंबरम यांना विशेष न्यायालयाने ब्रिटन आणि युरोपमधून 16 तासांच्या आत सीबीआय तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले होते. कार्ती सर्वोच्च न्यायालय आणि विशेष न्यायालयाच्या परवानगीने परदेशात गेले होते. बुधवारी ते त्यांच्या दौऱ्यावरून परतले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सीबीआय कार्यालय गाठले. (हेही वाचा - Sex Work: सर्वोच्च न्यायालयाकडून 'सेक्स वर्क'चा एक व्यवसाय म्हणून स्वीकार; पोलिसांना दिले कडक निर्देश)
सीबीआय मुख्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना कार्ती चिदंबरम म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध खोटा खटला सुरू आहे. त्यांनी दावा केला की, त्यांनी कोणत्याही चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्याची सुविधा दिली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण कार्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी एस भास्कररामन यांना पंजाबमध्ये पॉवर प्लांट उभारणाऱ्या वेदांत ग्रुप कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (TSPL) च्या उच्च अधिकाऱ्याने 50 लाख रुपये लाच दिल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. सीबीआय एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, तेथे काम करणाऱ्या 263 चिनी कामगारांना प्रकल्प व्हिसा पुन्हा जारी करण्यात आला. या प्रकरणी एजन्सीने भास्कररामन यांना यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्पाच्या उभारणीचे काम एका चिनी कंपनीकडून केले जात होते.
सीबीआय एफआयआरनुसार, टीएसपीएलच्या एका कार्यकारिणीने 263 चीनी कामगारांना प्रकल्प व्हिसा पुन्हा जारी करण्याची मागणी केली होती. ज्यासाठी 50 लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)