Gaziabad Shocker: बँक्वेट हॉलमध्ये सापडला वेटरचा मृतदेह, कुटुंबियांकडून मालकावर खुनाचा आरोप; गाझियाबादमधील घटना
गाझियाबाद येथील सिहनी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील जीटी रोडवर आरके बॅंक्वेट हॉलमध्ये एका वेटरचा संशयास्पद मृत्यू झाला.
Gaziabad Shocker: गाझियाबाद (Gaziabad) येथील सिहनी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील जीटी रोडवर आरके बॅंक्वेट हॉलमध्ये एका वेटरचा संशयास्पद मृत्यू झाला. गुरूवारी सांयकाळी ही घटना घडली. बॅंक्वेटट हॉलच्या खोलीत त्याचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच, कुटुंबियांनी घटनास्थळी पोहोचले आणि बॅंक्वेट हॉलच्या मालकावर खुनाचा आरोप केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा-प्रेमसंबंधाच्या वादातून पत्नीची निर्घृण हत्या,कर्नाटकातील खळबळजनक घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचेले आणि चौकशी सुरु केली. रवी कुमार (२०) असं मृत मुलाचे नाव आहे. तो राकेश मार्ग येथे राहणारा होता. बॅंक्वेट हॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. मृत्यूची माहिती मिळताच, सर्व नातेवाईक घटनास्थळा जमा झाले. सकाळी दहाच्या सुमारास संतप्त लोकांनी बॅंक्वेट हॉलबाहेर जीटी रोड अडवला, बॅंक्वेट हॉलच्या मालकाने रवीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. लोकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवला, ही माहिती मिळताच, एसीपी रवी कुमार, पोलिस निरीक्षक विनेश कुमार घटनास्थळी पोहोचले.
रवीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. लवकरच कारण समोर येईल अशी माहिती एसीपीने दिली. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस ठाण्यातील अधिकारांनी दिली. रवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

