Karnataka Shocker: प्रेमसंबंधाच्या वादातून पत्नीची निर्घृण हत्या,कर्नाटकातील खळबळजनक घटना
कर्नाटकच्या चिक्कमगलुरु जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे
Karnataka Shocker: कर्नाटकच्या चिक्कमगलुरु जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे पत्नीला समजले. त्यानंतर पत्नीने पतीच्या प्रेयसीला फोन करून पतीकडून दुर राहण्यास सांगितले. याचं गोष्टीचा राग मनात धरत पतीने पत्नीला ठार मारले. या दर्शन असं आरोपीचे नाव आहे. आणि श्वेता असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दर्शन आणि श्वेताचं तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. (हेही वाचा-बापाचं घृणास्पद कृत्य! मुंबईत 15 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील देववृंदा गावात तिच्या राहत्या घरी श्वेताचा खून केला. आरोपीने जेवणात विष टाकलं होते आणि नकळत श्वेताने विषारी अन्न प्राशान केलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला. अलीकडे दर्शनचे त्याचा कामाच्या ठिकाणी एका महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. हा घटनेची माहिती श्वेताला मिळाली. श्वेताने महिलेला फोन करून पतीसोबत अफेअर न ठेवण्याचे सांगितले. दर्शनपासून दुर राहण्यास सांगितले. या घटनेनंतर दर्शनला राग अनावर झाला आणि श्वेताला संपवण्याचा कट रचला. तिला जेवणात विष घालून दिल्याने तिचा मृत्यू झाला. श्वेताला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे श्वेताच्या पालकांना दर्शन खबर दिली.
पालकांना या गोष्टीचा संशय आला आणि श्वेताचा मृत्यू झाल्याचं पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी श्वेताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या तपसाणीत तिचा मृत्यू ह्रदयविकाराने न झाल्याचे समोर आले. त्यानंतर पालकांचा संशय आणखी वाढला आणि पोलिस ठाण्यात दर्शन विषयी तक्रार नोंदवली. पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने पोलिसांना श्वेताच्या हत्येची कबुली दिली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2023 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

