काँग्रेसच्या 'शिदोरी' नियतकालिकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुन्हा टीका

या नियतकालिकातील एका लेखात 'सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाहीत माफीवीर आहेत.' तसेच दुसऱ्या एका लेखात 'अंधारातील सावरकर', असं म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.

Vinayak Damodar Savarkar (File Photo)

काँग्रेसच्या 'शिदोरी' नियतकालिकातून (Shidori Magazine) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Swatantryaveer Savarkar) पुन्हा टीका करण्यात आली आहे. या नियतकालिकातील एका लेखात 'सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाहीत माफीवीर आहेत.' तसेच दुसऱ्या एका लेखात 'अंधारातील सावरकर', असं म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांच्या संदर्भातील पुस्तक वाटप करण्यात आले होते. या पुस्तकात सावरकरांची बदनामी करण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला होता. या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी भाजप तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच भाजपने यावरून काँग्रेसवर हल्ला चढवला होता. मात्र आता काँग्रेसने पुन्हा आपल्या नियतकालिकामध्ये सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्य लिखाण केल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - मध्य प्रदेश: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी आक्रमक आंदोलनानंतर नगरपालिकेकडून सांमजस्याची भूमिका; लवकरच मोहगावात बसवणार नवा पुतळा)

काँग्रेसच्या फेब्रुवारी महिन्यातील शिदोरी या नियतकालिकामधील एका लेखाला 'स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर' तर दुसऱ्या लेखाला 'अंधारातील सावरकर' असं शिर्षक देण्यात आलं आहे. यातील पहिल्या लेखात सावरकरांसंदर्भातील सर्व दस्ताऐवज तपासल्यास सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर असल्याचं सिद्ध होतं, असं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या लेखात सावरकरांच्या चारित्र्याशी संबंधित घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे यावर भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिदोरीचे संपादक रत्नाकर महाजन यांनी सावरकर यांचे लेख प्रकाशित करण्यासाठी पक्ष श्रेष्ठी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर राहुल गांधी यांच्याकडून होकार देण्यात आल्याने हे लेख प्रकाशित करण्यात आल्याचे रत्नाकर यांनी सांगितलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif