Goa Election 2022: गोव्यात मोफत वीज, पाणी आणि शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये - अरविंद केजरीवाल
पर्यटन क्षेत्राचा विकास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केला जाईल. वीज आणि पाणी 24 तास मोफत दिले जाईल, तसेच रस्ते दुरुस्त केले जातील.
गोवा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvin Kejriwal) यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्यासाठी अनेक झटपट घोषणा केल्या. राज्यात 'आप'चे सरकार आल्यास सर्वांना रोजगार दिला जाईल आणि ते देऊ शकले नाहीत तर प्रत्येकाला तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल, असे केजरीवाल म्हणाले. याशिवाय महिलांसाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 1000 रुपये देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. ते म्हणाले, 'शेतकऱ्यांसोबत बसून शेतीच्या समस्यांवर तोडगा काढू. पर्यटन क्षेत्राचा विकास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केला जाईल. वीज आणि पाणी 24 तास मोफत दिले जाईल, तसेच रस्ते दुरुस्त केले जातील.
Tweet
आमचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही सहा महिन्यांत जमिनीच्या हक्कावर काम करू. बेरोजगारांना भत्ता देण्याचे कामही जोमाने केले जाणार आहे. खाणींबाबत आम्ही येथे काम करू. या वेळी खरा बदल घडेल, असे त्यांना वाटते. यापूर्वी जनतेला पर्याय नव्हता, एकदा भाजप आणि एकदा काँग्रेस येत होती. यामुळे लोक कंटाळले असून त्यांना आता बदल हवा आहे. (हे ही वाचा Assembly Election 2022: नागरिकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यास 22 जानेवारीपर्यंत परवानगी नाही, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय)
Tweet
10 मार्चला लागेल निकाल
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने गोवा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला निकाल लागणार आहे. गोव्यासोबतच देशातील इतर चार राज्ये, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाबमध्येही १० मार्चला मतमोजणी होणार आहे.
'आप'ने आतापर्यंत 25 उमेदवारांची केली घोषणा
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आतापर्यंत 40 विधानसभा जागांपैकी 25 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 'आप'च्या तिसऱ्या यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, तर दुसऱ्या यादीत 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचवेळी पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली.