तेलंगणा: घराचे छप्पर कोसळल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, तर एकजण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एकजण जखमी झाली. आज सकाळी हा अपघात झाला. नगरकरोलचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शाकिर हुसेन यांनी सांगितले की, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पावसामुळे छत कोसळले आणि त्यामुळे नागरकोल जिल्ह्यातील बुद्धाराम गावात 3 महिला आणि 2 मुलींचा मृत्यू झाला.

Representational Image | (Photo Credits: PTI)

तेलंगणात (Telangana) एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एकजण जखमी झाली. आज सकाळी हा अपघात झाला. नगरकरोलचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शाकिर हुसेन यांनी सांगितले की, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पावसामुळे छत कोसळले आणि त्यामुळे नागरकोल जिल्ह्यातील बुद्धाराम गावात 3 महिला आणि 2 मुलींचा मृत्यू झाला.

हुसेन यांनी पीटीआय या वृतसंस्थेला या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, "शनिवारी कुटुंबातील नऊ सदस्य कुटुंबप्रमुखाची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमले होते. त्यातील आठ जण एका खोलीत झोपले होते. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा - हैदराबाद: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने इमारतीहून उडी मारून केली आत्महत्या; 20 तास पडून राहिला मृतदेह)

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृत्यू झालेल्या पाच जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात तेलंगणात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत पावसामुळे होणाऱ्या घटनांमध्ये कमीतकमी 50 जणांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - हाथरस पुन्हा हादरल! दोन अल्पवयीन मुलांकडून 4 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार)

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासांमध्ये देशभरात 50 हजार 129 नवे करोनाबाधित आढळले असून 578 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 78 लाख 64 हजार 811 वर पोहचली आहे. अशातचं यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.