झांसी: भिंत कोसळून 5 कामगारांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर जखमी
या घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 7 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बरुआसागर पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मणपुरा गावात घडली. स्टोन क्रशरच्या भिंतीवर प्लास्टर करत असताना अचानक हा अपघात झाला. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात करण्यात आली
उत्तर प्रदेशमधील झांसी (Jhansi) येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळल्याची (Wall Collapse) घटना घडली आहे. या घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 7 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बरुआसागर पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मणपुरा गावात घडली. स्टोन क्रशरच्या भिंतीवर प्लास्टर करत असताना अचानक हा अपघात झाला. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, अपघातात पडलेल्या भिंतीचं कोठेही रजिस्ट्रेशन करण्यात आलं नव्हतं. ही भिंत बांधणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आली नव्हती. कामगार कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय काम करत होते. त्यामुळे या अपघातानंतर अनेक संशयास्पद प्रश्न निर्माण झाले आहेत. या अपघातामुळे स्टोन क्रशरचा मालकही वादात सापडला आहे. (हेही वाचा - बुलढाणा: एसटी बस खड्ड्यात अडकली; अपघातात 23 विद्यार्थी जखमी)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासनही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.