Gujarat Shocker: अपमानाचा बदला घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बॉसला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; सोशल मीडियावर प्रसारित केले न्यूड फोटो

प्राप्त माहितीनुसार, समीर गुप्ता (नाव बदलले आहे) म्हणून ओळखल्या जाणार्‍या सॉफ्टवेअर फर्मचा प्रवर्तक, त्याच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी रचलेल्या हनीट्रॅपला बळी पडला. प्रीती आणि अनिश (दोन्ही नावे बदलली आहेत) या नावाने ओळखल्या जाणार्‍या या जोडप्याने गुजरातच्या वडोदरा येथे व्यावसायिक अपमानाचा बदला घेण्याचा कथित प्रयत्न केला.

Arrest | Pixabay.com

Gujarat Shocker: गुजरात (Gujarat) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बॉसला हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवले आणि त्याचे न्यूज फोटो (Nude Photos) सोशल मीडियावर प्रकाशित केले. प्राप्त माहितीनुसार, समीर गुप्ता (नाव बदलले आहे) म्हणून ओळखल्या जाणार्‍या सॉफ्टवेअर फर्मचा प्रवर्तक, त्याच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी रचलेल्या हनीट्रॅपला बळी पडला. प्रीती आणि अनिश (दोन्ही नावे बदलली आहेत) या नावाने ओळखल्या जाणार्‍या या जोडप्याने गुजरातच्या वडोदरा येथे व्यावसायिक अपमानाचा बदला घेण्याचा कथित प्रयत्न केला.

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, तीन महिन्यांत हा प्रकार घटला. ज्या दरम्यान गुप्ता या जोडप्याने तयार केलेल्या बनावट Instagram खात्याद्वारे स्वतःचे नग्न फोटो पाठविण्यास प्रवृत्त झाले. हे फोटो नंतर गुप्ता यांच्या पत्नीसह त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये प्रसारित केले गेले, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. (हेही वाचा - Uttar Pradesh Video: शामली येथील नगरपरिषदेत दोन सदस्यांमध्ये फ्रि स्टाईल मारमारी, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शेअर केला व्हिडिओ)

गुप्ता यांनी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. अधिकाऱ्यांनी प्रीती आणि अनिश यांचा माग काढला, ज्यांनी असा दावा केला की, गुप्ता यांना व्यावसायिक कारणांमुळे फटकारण्याची आणि त्यांची थट्टा करण्याची सवय होती. याशिवाय या जोडप्याने स्पीडपोस्टद्वारे गुप्ता यांच्या पत्नीच्या कार्यालयात चित्रांचे प्रिंटआउट पाठवले. (हेही वाचा - Wife Stabs Husband In His Eyes With Scissor: यूट्यूबची मजा...आयुष्यभराची शिक्षा! बायकोच्या फोनवर गाणी ऐकणे पतीला पडलं महागात; पत्नीने कात्रीने वार करून फोडले डोळे)

दरम्यान, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात, अपमानास्पद आणि धमक्या देणार्‍या ईमेल्सपासून कोणताही दिलासा न मिळाल्याने, गुप्ता यांनी सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधला. हे कॉर्पोरेट शत्रुत्वाचे प्रकरण होते. आम्ही आवश्यक कायदेशीर पावले उचलली आहेत, असं वडोदराचे एसीपी (सायबर क्राईम) हार्दिक मकाडिया यांनी सांगितले. या दोघांना सीआरपीसी 41 (ए) अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु गुप्ता या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करण्यास उत्सुक नाहीत, असं मकडिया यांनी सांगितलं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now