Election Commission New Guidelines: 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, इनडोअर-आउटडोअर बैठकांसाठी वाढीव सवलत

उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

Election Commission New Guidelines: 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, इनडोअर-आउटडोअर बैठकांसाठी वाढीव सवलत
Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

Election Commission New Guideline: पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रोड शो, पदयात्रा, सायकल/बाइक किंवा वाहनांच्या रॅली आणि मिरवणुका काढण्यावर बंदी कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाने रविवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. तथापि, इनडोअर हॉलमध्ये सार्वजनिक शारीरिक बैठकांसाठी आणि बाहेरच्या बैठकांसाठी आयोगाने काही सवलती दिल्या आहेत.

आयोगाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुरूच राहील. EC च्या नवीन मार्गदर्शक तत्वातील इतर महत्वाच्या गोष्टी खालीप्रमाणे...(वाचा - Gorakhpur: लेडी डॉनने दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोरखनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी)

EC ने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे -

पाच राज्यात विधानसभा निवडणूका -

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारीला एकाच दिवशी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तराखंडमधील 70, उत्तर प्रदेशातील 403, पंजाबमधील 117, मणिपूरमधील 60 आणि गोव्यातील 40 जागांसाठी 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.