UPSC CDS I 2021 Admit Card Released: युपीएससी सीडीएस परीक्षेचे ई अॅडमीट कार्ड upsc.gov.in वरून 7 फेब्रुवारीपर्यंत असं करा डाऊनलोड
हे यंदा ई अॅडमीड कार्ड असेल.
युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात युपीएससी कडून Combined Defence Services Exam 2021 (CDS 1 2020)चं अॅडमीड कार्ड जारी करण्यात आलं आहे. हे यंदा ई अॅडमीड कार्ड असेल. परीक्षार्थ्यांना upsc.gov.in या युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर ते आता उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
यंदा UPSC CDS I 2021 exam देशभरात 7 फेब्रुवारी 2021 ला होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांना त्यांची ई अॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करून घेण्यासाठी या 7 फेब्रुवारी पर्यंत वेळ दिला जाणार आहे. ही 300 गुणांची लेखी परीक्षा असेल. यामध्ये इंग्रजी, जीके आणि एलिमेंटरी मॅथ्स या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयाचा पेपर 100 गुणांचा असेल. 2 तासांचा हा पेपर असेल. चूकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम असेल. त्यासाठी प्रत्येक चूकीच्या उत्तराला 0.33 मार्क वजा होणार.
कसे डाऊनलोड कराल UPSC CDS I 2021 exam अॅडमीट कार्ड
- upsc.gov.in ला भेट द्या. त्यानंतर “Combined Defence Services Examination (I), 2021 E Admit Card Download” च्या लिंकवर क्लिक करा.
- नंतर नव्या विंडोवर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर सार्खेमहत्त्वाचे डिटेल्स भरून लॉग ईनकरा.
- तुमच्या स्क्रीनवर तुमचं ई अॅडमीट कार्ड दिसेल. ते डाऊनलोड करा. त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.
दरम्यान या परीक्षेमध्ये निवडलेले उमेदवार नंतर 49 आठवड्याच्या ट्रेनिंगसाठी असतील. त्यांना कोर्सचे ट्रेनिंग दिलं जातं. या परीक्षेतून निवड झालेल्यांनांचा पे स्केल हा अंदाजे 2.5 लाख रूपयांचा असतो.