Top 10 Cities Famous for Education: शैक्षणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली भारतामधील टॉप 10 शहरे; यादीत पुणे व मुंबईचा समावेश (See Full List)
भारतीय लोक अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ होत आहेत. अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक आता मंत्री आणि पंतप्रधान बनत आहेत.
शहराच्या शैक्षणिक विकासाचे मोजमाप हे त्या शहरातील शिक्षण आणि शिक्षित लोकांवरून केले जाते. शहरातील शिक्षण हे त्या विशिष्ट प्रदेशाचा आणि परिणामी संपूर्ण देशाचा आर्थिक विकास देखील सुनिश्चित करते. गेल्या 2-3 दशकांमध्ये, भारतातील आयटी अभियंते आणि व्यवस्थापन व्यावसायिकांनी जगभरातील अनेक उद्योगांना काबीज केले आहे. भारतीय लोक अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ होत आहेत. अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक आता मंत्री आणि पंतप्रधान बनत आहेत.
हे सर्व शक्य होत आहे ते फक्त शैक्षणिक विकासामुळे. आता भारतामधील 10 सर्वाधिक शिक्षित शहरांची यादी समोर आली आहे. ही शहरे उच्च साक्षरता दर, दर्जेदार शिक्षण आणि देशातील काही सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या उपस्थितीसाठी ओळखली जातात. या शहरांमध्ये नोकरीची बाजारपेठही मोठी आहे. यामध्ये कर्नाटकमधील बंगळूरूने बाजी मारली आहे.
- बंगळुरू- स्वातंत्र्यानंतर, बंगळुरूने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील शिक्षण. बंगलोरमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत.
- पुणे- पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. विधी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी पुण्याला विद्यार्थ्यांची पहिली पसंती राहिली आहे.
- हैदराबाद- या यादीमध्ये हैद्राबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अशा अनेक नामांकित संस्था हैद्राबादमध्ये आहेत. ह हिद्राबादमध्ये आहेत.
- मुंबई- मुंबई हे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड टेक्नॉलॉजी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इतर अनेक जगप्रसिद्ध संस्था मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये अनेक खाजगी, सार्वजनिक आणि आंतरराष्ट्रीय महाविद्यालये आहेत.
- दिल्ली- देशाची राजधानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्ली हे दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यासारख्या अनेक प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठांचे घर आहे. एम्स आणि आयआयटी दिल्ली सारख्या प्रतिष्ठित संस्थांसह हे शहर एक अभियांत्रिकी आणि वैद्यकीय केंद्र देखील आहे. या व्यतिरिक्त, शहरात अनेक खाजगी आणि सार्वजनिक संस्था आहेत ज्या शिक्षणात उत्कृष्टतेच्या चार्टमध्ये अव्वल आहेत.
- चेन्नई- या यादीमध्ये चेन्नई सहाव्या स्थानी आहे. चेन्नईला आयआयटी मद्रास सारख्या प्रतिष्ठित संस्थांसह भारतातील प्रमुख अभियांत्रिकी केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक संशोधन संस्था आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून हे शहर विविध क्षेत्रातील अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना आकर्षित करते. (हेही वाचा: CM Fellowship Program: युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची सुवर्णसंधी; 2 मार्च पर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या सविस्तर)
- कोलकाता- यादीतील सातवा क्रमांक कोलकाताचा आहे. कोलकाता हे ऐतिहासिकदृष्ट्या देशातील शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. जाधवपूर विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इतर अनेक प्रतिष्ठित संस्था संभाव्य उमेदवारांना आकर्षित करतात.
- अहमदाबाद- आठव्या स्थानी अहमदाबाद आहे. हे एक भरभराटीचे शैक्षणिक शहर आहे, ज्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, निरमा युनिव्हर्सिटी, गुजरात युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक उत्कृष्ट संस्था आहेत. नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करणारी उच्च श्रेणीची सार्वजनिक आणि खाजगी महाविद्यालये या शहरात आहेत.
- जयपूर- नवव्या स्थानी जयपूर आहे. देशातील गुलाबी शहर हे शिक्षणासाठी सर्वात प्रसिद्ध केंद्रांपैकी एक म्हणून वेगाने विकसित झाले आहे
- सुरत- अखेर दहाव्या स्थानी सुरत आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वीर समद दक्षिण गुजरात युनिव्हर्सिटी इत्यादीसारख्या सुरतमधील अनेक खाजगी आणि सार्वजनिक संस्था विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत.
(टीप- ही यादी न्यूज नेशनच्या वृत्तावरून तयार केली आहे. लेटेस्टी मराठी या यादीची पुष्टी करत नाही.)