SBI कडून ग्राहकांना दिलासा, आता 'या' एका कॉलवर होणार सर्व कामे

आता युजर्सला घरबसल्या फोनवरच बँक संबंधित काही कामे करता येणार आहेत.

SBI (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. प्रतिदिनी लाखोंच्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. अशातच घरीच थांबणे सध्याच्या परिस्थितीत योग्य पर्याय आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआयने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅकलैस सर्विस (Contactless Service) ची सुरुवात केली आहे. आता युजर्सला घरबसल्या फोनवरच बँक संबंधित काही कामे करता येणार आहेत.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता; Dearness Allowance बाबत लवकरच होणार निर्णय)

SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. State Bank Of India ने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, घरीच थांबा, सुरक्षित रहा. आम्ही तुमची सेवा करण्यासाठी आहोत. SBI तुम्हाला एका संपर्कासह सेवा देणार आहे. जो तुमच्या तत्काळ बँकिंगच्या गरचा पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. आमचा टोल फ्री क्रमांक- 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा.(गोव्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता चित्रपट, मालिका आणि म्युझिकल शोच्या शूटिंगसाठी देण्यात आलेली परवानगी मागे घेण्यात आली- एसपी देसाई)

Tweet:

बँकेने आपल्या ट्विटसह एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. त्यांनी असे म्हटले की, या क्रमांकांवर कॉल करुन ग्राहकांना कोणत्या कोणत्या सेवा दिल्या जाणार हे कळणार आहे. व्हिडिओच्या मते, अकाउंट बॅलेंस आणि अखेरच्या 5 ट्राजेक्शनच, ATM बंद किंवा चालू, ATM पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करता येणार आहे. नव्या एटीएमसाठी वर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर ही कॉल करु शकता. एसबीआय बँकेचे 44 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.