SBI PO Recruitment 2020: एसबीआय मध्ये PO च्या 2 हजार रिक्त जागांवर नोकर भरती, येथे डाऊनलोड करा Application फॉर्मसह महत्वाची माहिती
SBI PO Recruitment 2020: भारतीय स्टेट बँक (SBI) यांनी प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि क्लर्कच्या रिक्त जागांवर भरतीसाठी परीक्षा आयोजित केली जाते. मात्र यंदाच्या वर्षात एसबीआयने पीओ भरतीसाठी 2 हजार रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. एसबीआयच्या पीओ 2020 साठी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना परीक्षा पॅटर्न, परीक्षेची तारीख, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज आणि अन्य गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
परीक्षा 3 स्तरात आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये Objective, Objective Test and Descriptive Test, Group Discussion and Personal Interviwe चा समावेश आहे. अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या स्तरामध्ये एक परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. तर प्रत्येक परीक्षेच्या गुणांवर अंतिम परीक्षेत सहभागी होता होणार की नाही ते निर्भर असणार आहे. पीओ भरतीसाठी नोटिफिकेशन पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ज्या उमेदवारांना एसबीआय पीओ 2020 च्या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा असल्यास त्यांना परीक्षा पॅटर्न, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, परीक्षेची तारीख, अभ्यासक्रम, प्रवेश पत्र, परीक्षेचा कालावधी, निकालासह कट ऑफ बद्दल ही माहिती असणे गरजेचे आहे.(Indian Army Recruitment 2020: भारतीय सैन्य दलात टेक्निकल एंट्री कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी बुधवारी अंतिम तारीख; joinindianarmy.nic.in वर करा Apply)
एसबीआय पीओ 2020 पात्रता:
उमेदवाराचे वर्ष 1 जुलै, 2020 पर्यंत 21-30 दरम्यान असले पाहिजे. त्याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही विषयात डिग्री असली पाहिजे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक योग्यता, वय वर्ष आणि नागरिकतेबद्दल तपास करुन घ्यावा.