Sarkari Naukri: निरीक्षक, कॉन्स्टेबल व इतर जागांसाठी 1015 पदांची पोलिस भरती; 5 वी, 9 वी, 10 वी व 12 वी पास करू शकतात अर्ज

पोलिसातील कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत अधिसूचना एकदाच वाचा. आपण ज्या पोस्टसाठी अर्ज करत आहात त्याबाबत सर्व पात्रता तपासून घ्या. आपण पदासाठी पात्रतेची आवश्यकता पूर्ण केल्यावरच नोकरीसाठी अर्ज करा

पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (PTI photo)

Government Job News: पोलीस खात्यात सरकारी नोकरीचे ज्यांचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मेघालय इथे 1 हजारहून अधिक जागांसाठी नोकरभरती चालू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2019 आहे. यामध्ये कॉन्स्टेबल, फायरमॅन, ड्रॉवर, एमपीआरओ ऑपरेटर कॉन्स्टेबल, सशस्त्र शाखा कॉन्स्टेबल, ड्रायव्हर कॉन्स्टेबल, सिग्नल ऑपरेटर, कमांडो कॉन्स्टेबल इत्यादी पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 12 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.

पदांची एकूण संख्या –

1015

पदांची नावे 

UB Sub-Inspector - 41, Unarmed Branch Constable - 268, Fireman (Male) - 37, Driver - 25, MPRO Operator Constable - 21, Armed Branch Constable/BN Constable - 368, Driver Constable (Male) - 13, SF 10, AB Sub-Inspector - 3, Signal Operator - 5, Commando Constable (Male) - 98, Commando Constable (Female) - 41, Follower (Male) - 64, Follower SF10 (Male) - 10

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

14 डिसेंबर 2019

अर्ज शुल्क –

उमेदवाराला प्रत्येक पदासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

वयमर्यादा –

उपनिरीक्षकासाठी 21 ते 27 वर्षे, कॉन्स्टेबल, फायरमन, ड्रायव्हर्स, ऑपरेटरसाठी 18 ते 21 वर्षे, आर्मर्ड ब्रांच कॉन्स्टेबल, ड्रायव्हर कॉन्स्टेबल (मेल) साठी 18 ते 21 वर्षे, कमांडो कॉन्स्टेबल (महिला) आणि फॉलोअर्ससाठीही 18 ते 21 वर्षे व वय मर्यादा. (हेही वाचा: IBPS मध्ये 1163 पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया)

megpolice.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.

दरम्यान, मेघालय पोलिसातील कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत अधिसूचना एकदाच वाचा. आपण ज्या पोस्टसाठी अर्ज करत आहात त्याबाबत सर्व पात्रता तपासून घ्या. आपण पदासाठी पात्रतेची आवश्यकता पूर्ण केल्यावरच  नोकरीसाठी अर्ज करा. पात्रता पूर्ण नसल्यास, अर्ज रद्द केला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now