NEET-UG Result 2024 Controversy: सुप्रीम कोर्टाची राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेसंदर्भात केंद्राला नोटीस; 8 जुलैला होणार पुढील सुनावणी
त्यावरही 8 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
NEET-UG Result 2024 Controversy: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET-UG 2024) आयोजित करण्याला आव्हान देणाऱ्या सात याचिकांवर नोटीस जारी केली आहे. तसेच प्रलंबित याचिकांसह 8 जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. एका याचिकेत कथित पेपर लीकची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेपर लीकच्या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका हस्तांतरित करण्यासाठी एनटीएमार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यावरही 8 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठाने NTA च्या वकिलाच्या सादरीकरणाची दखल घेतली की, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांच्या आधारे NEET UG, 2024 रद्द करण्याच्या अनेक याचिका विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. (हेही वाचा -NEET UG 2024 Result: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेत 1,563 उमेदवारांना दिलेले ग्रेस मार्क्स रद्द; NTA येत्या 23 जून रोजी घेणार नवी परीक्षा)
सुनावणीदरम्यान, खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या एका वकिलाने कोटा येथील विद्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या निवेदनावर आक्षेप घेतला. कोटामधील आत्महत्या NEET-UG 2024 च्या निकालामुळे झाल्या नसल्याची टिप्पणी करून न्यायमूर्ती नाथ यांनी वकिलांना सांगितले की, 'येथे अनावश्यक भावनिक युक्तिवाद करू नका. (हेही वाचा - (हेही वाचा: NEET Exam 2024: देशभरातील राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षांमधील भ्रष्टाचाराकडे आदित्य ठाकरेंनी वेधलं केंद्र सरकारचं लक्ष; तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी केली 'ही' मागणी)
दरम्यान, NEET-UG 2024 परीक्षा 5 मे रोजी 4,750 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेत सुमारे 24 लाख उमेदवारांनी त्यात भाग घेतला. 14 जून रोजी निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र 5 जून रोजी निकाल जाहीर झाला. NTA च्या इतिहासात अभूतपूर्व, 67 विद्यार्थ्यांनी 720 गुण मिळवले आहेत. हरियाणातील फरिदाबाद येथील एका केंद्रातून सहा विद्यार्थ्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे गैरप्रकार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.