NEET-PG Exam 2021: नीट परीक्षा किमान 4 महिने पुढे ढकलण्यात येईल - पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, नीट-पीजी परीक्षा कमीतकमी 4 महिने पुढे ढकलण्यात येणार आहे.
NEET-PG Exam 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीचे संकट आणि देशातील वैद्यकीय कर्मचार्यांची संख्या वाढविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, नीट-पीजी परीक्षा कमीतकमी 4 महिने पुढे ढकलण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार, एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ड्यूटी सौम्य लक्षणं असणाऱ्या कोविड रुग्णांच्या सेवेसाठी लावण्यात येईल. बीएससी (नर्सिंग) / जीएनएम पास परिचारिकांची सेवा वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ नर्सिंग ड्यूटीसाठी लावण्यात येईल. (वाचा - CBSE Board 10th Result 2021 Date: दहावीचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर; बोर्डाने केली घोषणा)
यासह कोविड-19 ड्युटीचे 100 दिवस पूर्ण केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आगामी सरकारी नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येईल. यासह कोविड मॅनेजमेंटमधील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मेडिकल इंटर्नची ड्युटीही लागू केली जाईल. (वाचा - MBBS Exam: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार एमबीबीएसची परीक्षा; अमित देशमुख यांची माहिती)
या व्यतिरिक्त कोविड-19 ड्युटीचे 100 दिवस पूर्ण केलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कोविड नॅशनल सर्व्हिस सन्मान (Prime Minister’s Distinguished Covid National Service Samman) देण्यात येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)