NEET 2021 Exam Date: 1 ऑगस्ट ला होणार वैद्यकीय प्रवेश परीक्षा, NTA ने केली घोषणा
1 ऑगस्ट रोजी हिंदी आणि इंग्रजीसह 11 भाषांमध्ये परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये परीक्षा अभ्यासक्रम, वयाची अट, पात्रता निकष, आरक्षण, जागांचे वर्गीकरण, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्र यासंबंधी माहिती लवकरचं जाहीर केली जाईल.
NEET 2021 Exam Date: राष्ट्रीय चाचणी एजन्सीने NEET 2021 प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यावर्षी, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) 01 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात येईल. शुक्रवारी परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (NTA) सांगितले की, ही परीक्षा 'पेन आणि पेपर मोड' मध्ये घेण्यात येईल. वैद्यकीय प्रवेशासाठी NEET परीक्षेची तारीख एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर ntaneet.nic.in/nta.ac.in जाहीर करण्यात आली आहे.
एनटीएने अधिसूचना जारी केली आहे की, MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS, आणि BHMS अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी NEET 2021 संबंधित निकष, मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येत आहेत. (वाचा - JEE Main Admit Card 2021: जेईई मेन मार्च सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी; jeemain.nta.nic.in लिंकवरून करा डाउनलोड)
NEET प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी पास असणे आवश्यक आहे. 12 वी बोर्डाच्या परीक्षेत भाग घेणारे विद्यार्थीदेखील NEET 2021 परीक्षेत सहभागी होऊ शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)