MPSC Students Protest in Pune: एमपीएससी उमेदवारांचे पुणे येथे आंदोलन; आगामी परीक्षेत 258 कृषी सेवा पद समावेश करण्याची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पुणे येथे मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर आंदोलन (Student Protest) केले. येत्या 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागातील (Maharashtra Agricultural Service Department) 258 पदांचा समावेश करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या () परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पुणे येथे मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर आंदोलन (Student Protest) केले. येत्या 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागातील (Maharashtra Agricultural Service Department) 258 पदांचा समावेश करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याचे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला एमपीएससी (MPSC) कडून तुर्तास तरी नकार मिळाल्याचे समजते.
'मागणी पत्र मिळाले नसल्याने उल्लेख नाही'
एमपीएससी 25 ऑगस्ट रोजी प्राथमिक परीक्षा घेणार आहे, परंतु उमेदवार महाराष्ट्र कृषी सेवेतील 258 पदांचा परीक्षेत समावेश करण्याचा आग्रह धरत आहेत. एमपीएससीने स्पष्ट केले की, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठी 29 डिसेंबर 2023 रोजी वर्तमान परीक्षेची जाहिरात प्रकाशित होईपर्यंत त्यांना सरकारचे मागणी पत्र प्राप्त झाले नाही. या वेळेअभावी, कृषी पदांचा समावेश करणे त्यांना शक्य झाले नाही. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी 25 ऑगस्टच्या परीक्षेची तयारी आधीच पूर्ण झाल्यावर भर दिला. त्यांनी उमेदवारांना आश्वासन दिले की मागणी पत्रात नमूद केलेल्या कृषी सेवा पदांसाठी भरती प्रक्रिया भविष्यातील परीक्षेत संबोधित केली जाईल. (हेही वाचा, MPSC Estimated Schedule for 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर, घ्या जाणून)
विद्यार्थी मागणीवर ठाम
एमपीएससीने दिलेल्या आश्वासनानंतरही उमेदवारांनी ठाम भूमिका घेत पुणे येथील शास्त्री रोडवरही ठिय्या आंदोलन करत आपला असंतोष व्यक्त करत घोषणाबाजी केली. विद्यार्थी, परीक्षार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मोठा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना शांततेने निदर्शने करण्याचे आवाहन केले. ज्याला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली.
दरम्यान, पुण्यातील नवी पेठ परिसरात रात्री 9 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांनी आगामी MPSC परीक्षेतून कृषी सेवा पदे वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आदल्या दिवशी, एमपीएससीने एक परिपत्रक जारी केले होते की या पदांचा या वर्षीच्या परीक्षेत समावेश करणे शक्य नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये निराशा वाढली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी कृषी विभागाच्या गट अ आणि गट ब संवर्गातील 258 मंजूर पदांसाठी त्वरित जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहेत. ही पदे 25 ऑगस्टच्या परीक्षेत जोडण्याचा त्यांनी आग्रह धरला. दरम्यान, एमपीएससीने आगामी परीक्षेत या पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम असून, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थी आणि एमपीएससी यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)