MHT CET 2025 PCB Result: एमएचटी सीईटी ग्रुपचा पीसीबी चा निकाल जाहीर; mahacet.org वर असे पहा स्कोअरकार्ड

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून काल पीसीएम तर आज पीसीबी ग्रुपचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जाहीर करण्यात आले आहे.

MHT CET 2025 PCB Result: एमएचटी सीईटी ग्रुपचा पीसीबी चा निकाल जाहीर;  mahacet.org  वर असे पहा स्कोअरकार्ड
Result | Pixabay.com

कडून आज (17 जून) MHT CET 2025 PCB (Physics, Chemistry, Biology) ग्रुपचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना mahacet.org या अधिकृत वेबसाईट त्यांचे स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून त्यांना आज निकाल पाहता येणार आहे. काल सीईटी सेल कडून पीसीएम ग्रुपचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर झाला आहे.

पीसीबी ग्रुपची सीईटी यंदा 9 ते 17 एप्रिल दरम्यान झाली आहे. यामध्ये 2,82,737 विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही परीक्षा computer-based format मध्ये घेण्यात आली होती. multiple-choice questions च्या स्वरूपात विद्यार्थ्यांना उत्तरं द्यायची असतात. ही 100 मार्कांची परीक्षा असते. (हेही वाचा: MH-CET: गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अभ्यासक्रमांसाठी सीईटी राज्याबाहेर होणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती).

कसा पहाल पीसीबी ग्रुपचा निकाल ऑनलाईन?

  • MHT CET official website – mahacet.org वर क्लिक करा.
  • होमपेजवर MHT CET PCB Result 2025 link वर क्लिक करा.
  • तुमचा registered email ID आणि password टाका.
  • आता MHT CET Result 2025 PCB तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • निकालाची प्रत डाऊनलोड करा.

सीईटी सेलने पीसीबी ग्रुपसाठी 2025 च्या एमएचटी सीईटी टॉपर्सची अधिकृत यादी अद्याप जाहीर केलेली नसली तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक उमेदवारांनी 99 पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. निकालांनी शहरी आणि ग्रामीण जिल्ह्यांमध्ये संतुलित कामगिरी आहे, ज्यामध्ये लहान शहरांमधील अनेक विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 08:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).