Maharashtra MHT CET 2021 परीक्षेचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियात व्हायरल, अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु वेळापत्र हे बनावट असून यावर आता महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Maharashtra MHT CET 2021: सोशल मीडियात MHT CET परिक्षेचे बनावट वेळापत्रक तुफान व्हायरल होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु वेळापत्र हे बनावट असून यावर आता महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, अशा प्रकारच्या वेळापत्रकाला बळी पडू नये. अद्याप MHT CET चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे यापासून सावध रहा असे विद्यार्थ्यांना सुचित करण्यात आले आहे.(मुंबई विद्यापीठाला NAAC कडून A++ मानांकन; Uday Samant यांच्याकडून कौतुक)

सोशल मीडियात सीईटी परिक्षेचे वेळापत्रक व्हायरल होत असल्याचे समोर आले. मात्र अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या अशा वेळापत्रकांवर विश्वास ही ठेवू नये असे सांगण्यात आले आहे.('Agriculture’ Subject in School Syllabus: आता शालेय अभ्यासक्रमात होणार ‘कृषी’ विषयाचा समावेश; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय)

परिक्षेचे वेळापत्रक लवकरच विद्यार्थ्यांसाठी जाहीर केले जाणार असून ते mahacet.org येथे त्यांना ते पाहता येईल. याआधी महाराष्ट्र सरकारने इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्चर कोर्सची प्रवेश परीक्षेबद्दल जाहीर केले होते. ती परिक्षा 4-10 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येईल असे ही सांगितले होते. मात्र परिक्षेसाठी अजून ही अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आलेले नाही. अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राज्यातील विवध ठिकाणी आणि राज्याच्या बाहेर परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत.