Maharashtra MBA CET 2021: महाराष्ट्रात MBA, MMS कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन mba2021.mahacet.org वर सुरू

त्यासाठी त्याला किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. तसेच ओबीसी किंवा इतर आरक्षित प्रवर्गासाठी 45% गुणांची मर्यादा आहे.

ऑनलाईन डेटिंग (Photo credits: RachelScottYoga/Pixabay)

महाराष्ट्र एमबीए सीईटी 2021 चे रजिस्ट्रेशन (Maharashtra MBA CET 2021) आता सुरू झाले आहे. यंदा एमबीए (MBA) किंवा एमएमएस (MMS) चे प्रोफेशनल कोर्स करू इच्छिणार्‍यांना 17 जुलै पर्यंत ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन करता येणार आहे. MAH MBA CET 2021 चं ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन mba2021.mahacet.org या संकेतस्थळावरून स्वीकारले जाणार आहे. दरम्यान कोणत्याही शाखेचा पदवीधर मॅनेजमेंट कोर्स साठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याला किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. तसेच ओबीसी किंवा इतर आरक्षित प्रवर्गासाठी 45% गुणांची मर्यादा आहे. यासोबतच पदवीच्या अंतिम वर्गाला असणारा विद्यार्थी देखील मॅनेजामेंट कोर्सच्या सीईटी साठी अर्ज करण्यास पात्र आहे. नक्की वाचा: 2nd Year Engineering Diploma: आता अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेत घेण्यात येणार; सरकारकडून प्रवेश व पात्रतेमध्ये बदल- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत.

Maharashtra MBA CET 2021 साठी कसा कराल अर्ज?

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, MBA / MMS Professional Post Graduate Degree ची प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. तर उर्वरित अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी सीईटी स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. Maharashtra Common Entrance Test Cell कडून Maharashtra CET 2021ची रजिस्ट्रेशन विंडो खुली करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सार्‍या सूचना नीट वाचून घ्याव्यात असे आवाहन देखील करण्यात आले आहे.