Maharashtra HSC, SSC Supplementary Exams Postponed: अतिमुसळधार पावसामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी,12वी च्या पुरवणी परीक्षा आज रद्द; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

25 जुलै दिवशी जारी परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे काल जे विद्यार्थी 10वी, 12वी च्या पुरवणी परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून सध्या राज्यात दहावी (SSC) , बारावीच्या (HSC) पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) सुरू आहेत. यामध्ये आज 26 जुलै च्या परीक्षा अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी काल 25 जुलै दिवशी मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळे आजही त्याचे परिणाम दिसत आहेत. काल 25 जुलै दिवशी जारी परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे काल जे विद्यार्थी 10वी, 12वी च्या पुरवणी परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार आहे. नक्की वाचा: Mumbai University Exams Postponed: अतिमुसळधार पावसाच्या अंदाजानंतर मुंबई विद्यापीठाकडून आजच्या रत्नागिरी, रायगड विभागाच्या परीक्षा रद्द .

आज 26 जुलैला दहावीचा सायन्स 2 चा पेपर होता तो आता 31 जुलै दिवशी 11 ते 1 दरम्यान घेतला जाणार आहे. बारावीचे Organisation of Commerce and Management, Food Science and Technology, आणि MCVC हे तीन पेपर 26 जुलै ऐवजी 9 ऑगस्टला होणार आहेत. 11 ते 2 अशी या पेपरची वेळ असेल.  इथे पहा बोर्डाने जारी केलेलं  परिपत्रक .

महाराष्ट्रामध्ये दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे तर बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दरम्यान उर्वरित परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मे महिन्यात निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पुरवणी परीक्षा आयोजित केली जाते.