Maharashtra Board HSC Result 2024: आज बारावीचा निकाल; दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर पहा गुण!
बारावीच्या विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाईन मार्क्सशीट अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहता येणार आहे.
MSBSHSE Class 12th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE)आज (21 मे) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) चा निकाल जाहीर केला जाणार आहे. बारावीची बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मागील अनेक दिवसांपासून निकालाची प्रतिक्षा होती. अखेर आज दुपारी 1 वाजता त्यांना ऑनलाईन त्यांचे मार्क्स पाहता येणार आहेत. बोर्डाकडून 11 वाजता निकालाचे वाचन आणि नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला 1 वाजता ऑनलाईन मार्क्सशीट अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात 9 विभाग मिळून बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. आता त्यांचे एकत्र निकाल जाहीर केले जातील ऑनलाईन माध्यमातून वेबसाईट वर तर SMS च्या माध्यमातून मोबाईल वर निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे.
बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल कुठे पहाल?
- mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- www.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- http://results.targetpublications.org
- https://www.tv9marathi.com/
बारावीचा निकाल कसा पहाल?
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
मागील वर्षी बारावीचा निकाल 91.25% लागला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो जाहीर करण्यात आला होता. आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आता निकालामध्ये टॉपर्सची यादी जाहीर केली जात नाही. मात्र तुम्ही तुमच्या निकालावर नाखूष असाल तर फेर पडताळणी, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी घेण्याचा पर्याय आहे. ही सेवा सशुल्क दिली जाते.