Job Recruitment: IT क्षेत्रातील लोकांसाठी मोठी बातमी; Infosys, HCL Tech, TCS आणि Wipro देणार 1 लाख फ्रेशर्सना नोकऱ्या

त्याचबरोबर या आर्थिक वर्षात इन्फोसिसतर्फे 26 हजार नवीन लोकांना नोकर्‍या मिळतील

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात अनेक राज्यात अनेक निर्बंध लागू केले आहेत. याकाळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे उद्योगधंदे बंद पडले. आता आयटी (IT) व्यावसायिकांसाठी चांगली बातमी आहे. देशातील चार मोठ्या आयटी कंपन्या- टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि एचसीएल टेक (HCL Tech) मोठ्या प्रमाणात देशातील आयटी व्यावसायिकांना नोकऱ्या देण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहेत. या चार कंपन्या यावर्षी देशातील सुमारे 1 लाख फ्रेशर्सना नोकर्‍या देतील. आयटी व्यावसायिकांना नोकरी देण्याची ही प्रक्रिया पगार वाढ आणि बोनससह सुरू राहील.

अनेक कंपन्या सध्या त्यांचे काम डिजिटल करत आहेत. यामुळेच सॉफ्टवेअर सेवेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी, गतवर्षीच्या तुलनेत वित्तीय वर्ष 2021 मध्ये 45 टक्के अधिक नोकऱ्या दिल्या आहेत. यावर्षी आयटी क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक त्यांच्या कंपन्यांमध्ये सुमारे 1 लाख नवीन लोकांना नोकरी देतील.

जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक टीसीएसने म्हटले आहे की, वित्तीय वर्ष 2022 मध्ये ही कंपनी 40 हजार नवीन लोकांना नोकर्‍या उपलब्ध करुन देईल आणि अशाप्रकारे या कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांची संख्या 5 लाखाहून अधिक होईल. त्याचबरोबर या आर्थिक वर्षात इन्फोसिसतर्फे 26 हजार नवीन लोकांना नोकर्‍या मिळतील तर यावर्षी एचसीएल टेककडून 12 हजार लोकांना नोकरी दिली जाईल. (हेही वाचा: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज)

विप्रोकडून यावर्षी किती नव्या लोकांना नोकर्‍या दिल्या जातील हे अजूनतरी सांगण्यात आले नाही, परंतु कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गिल म्हणाले की, कंपनी मागील वर्षाच्या तुलनेत वित्तीय वर्ष 2022 मध्ये अधिक लोकांना नोकरी देईल. मागील वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 9 हजार नवीन लोकांना नोकर्‍या दिल्या होत्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif