JEE Main 2021 Correction Window आजपासून खुली, 30 जानेवारी पर्यंत jeemain.nta.nic.in वर ऑनलाईन अर्जात करता येणार 'हे' बदल!

यामध्ये पहिला टप्पा 23-26 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 15-18 मार्च, तिसरा टप्पा 27-30 एप्रिल आणि चौथा टप्पा 24 ते 28 मे 2021 असा असेल.

Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

यंदाच्या जेईई मेन परीक्षा 2021 (JEE Main 2021 Exam) अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान या परीक्षेपूवी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात काही बदल करायचे असल्यास त्यासाठी आजपासून खास विंडो ओपन केली जाणार आहे. दरम्यान 30 जानेवारीपर्यंत हा बदल करण्याची मुभा आहे. jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर हे बदल करता येतील अशी माहिती देण्यात आली आहे.

National Testing Agency च्या परिपत्रकानुसार, जेईई मेन 2021 साठी करेक्शन विंडो 30 जानेपर्यंत खुली असेल. हीच अंतिम मुदत असल्याने त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी बदल करावेत असे सांगितले आहे. नक्की वाचा: JEE Main 2021: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेन परीक्षेसाठी 12 वी मध्ये 75 टक्के गुण अनिवार्य नाही- रमेश पोखरियाल निशंक.

JEE Main 2021 Correction window मध्ये काय बदल करता येतील?

जेईई ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन मध्ये विद्यार्थ्यांचं नाव, कॉन्टॅक्ट, पत्ता, कॅटेगरी, PwD status, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, परीक्षा केंद्र शहर यामध्ये बदल करता येऊ शकणार आहेत. 30 जानेवारीनंतर यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. दरम्यान विद्यार्थ्यांना रजिस्टर इमेल आयडी आणि मोबाईल नंबर करेक्शन विंडोच्या माध्यमातून बदलता येणार नाहीत.

NTA कडून यंदा JEE Main 2021 परीक्षा 4 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा 23-26 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 15-18 मार्च, तिसरा टप्पा 27-30 एप्रिल आणि चौथा टप्पा 24 ते 28 मे 2021 असा असेल.

National Testing Agency कडून यंदा जेईई मेन्स 2021 अ‍ॅडमीट कार्ड फेब्रुवारी 2021 मध्ये दुसर्‍या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप त्याची तारीख जाहीर केली नाही.