JEE Main 2021: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेन परीक्षेसाठी 12 वी मध्ये 75 टक्के गुण अनिवार्य नाही- रमेश पोखरियाल निशंक
मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी जेईई मेन संदर्भात 12 वी इयत्तेत 75 टक्के गुणांच्या पात्रतेसंबंधित नियम हटवला आहे.
JEE Main 2021: शिक्षण मंत्रालयाने जेईई मेन ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी जेईई मेन संदर्भात 12 वी इयत्तेत 75 टक्के गुणांच्या पात्रतेसंबंधित नियम हटवला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्रालयाने ही सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी ट्विट करत ही घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आयआयटी जेईई (अॅडवान्स) आणि मागील शैक्षणिक वर्षाबद्दल घेण्यात आलेले निर्णय लक्षात घेता पुढील शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी जेईई मेन परीक्षेत 12 वी मध्ये 75 टक्के गुणांची आवश्यकता नसणार आहे.
NIT,IIIT आणि अन्य केंद्रीय अनुदानीत तांत्रिक संस्थांमध्ये बीटेक, बीई च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन ची परीक्षा आयोजित केली जाते. शिक्षण मंत्रालयाने या घोषणेनंतर एनआयटी, आयआयआयटी, सीएफटीआय संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी 12वी मध्ये 75 टक्के गुण अनिवार्य नसणार असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे.(JEE (Mains) 2021 Exams Date: जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी ते मे दरम्यान होणार, पहिल्या सत्राचे पेपर 23 ते 26 मध्ये आयोजित- रमेश पोखरियाल निशंक)
Tweet:
जेईई मेन परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडवान्स परीक्षा देता येणार आहे. जेईई अॅडवान्स परीक्षेच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठित 23 आयआयटी संस्थेत प्रवेश मिळतो. जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी 12 वी इयत्तेत 75 टक्के गुणांची पात्रता असणे अनिवार्य करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षात कोरोनामुळे या नियमातून विद्यार्थ्यांना सूट दिली होती. 2020 पूर्वी जेईई अॅडवान्स मेरिट नियम अंतर्गत आयआयटी मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कमीतकमी 75 टक्के आणि प्रवेश परीक्षेत उत्तम गुण असणे अनिवार्य होते.