JEE Main 2021 परीक्षेच्या तिसर्‍या सत्रासाठी Admit Card जारी; इथे पहा डाऊनलोड कसं कराल?

नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 20-25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

भारतामध्ये कोविड 19 ची परिस्थिती थोडी निवळल्यानंतर आता पुन्हा स्थगित झालेल्या अनेक जुन्या गोष्टींना चालना देण्यास सरकारने सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक परीक्षांचा देखील समावेश आहे. NTA कडून जेईई मेन्सच्या उर्वरित दोन सत्राच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तिसर्‍या सत्राच्या Joint Entrance Examination (JEE)-Main 2021 चं अ‍ॅडमिट कार्ड देखील जारी झाले आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 20-25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमुळे जेईई मेन्सची दोन सत्र अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. आता त्या परीक्षा देखील पूर्ववत करून यंदाचे इंजिनियरिंगचे प्रवेश सुरू केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मग तुम्ही देखील या सत्रामध्ये परीक्षा देणार असाल तर जाणून घ्या जेईई मेन्स परीक्षा 2021 च्या तिसर्‍या सत्रासाठी ऑनलाईन तुमचं अ‍ॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड कराल? NEET (PG) Exam 2021 येत्या 11 सप्टेंबर रोजी आयोजित- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची घोषणा.

जेईई मेन्स अ‍ॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड कराल?

यंदा चौथ्या सत्राची जेईई परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यातआली आहे. त्याच्या अ‍ॅडमिट कार्ड्सबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. तर पहिली दोन सत्र फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली आहेत. आता उर्वरित दोन सत्रांसाठी परीक्षा केंद्र 660 वरून 828 इतकी वाढवण्यात आली आहेत. JEE Main Result 2021: जेईई मेन परीक्षा रिजल्ट जाहीर; जाणून घ्या कुठे, कसा पाहाल?

यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना 75 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित याचे प्रत्येकी 25 प्रश्न आहेत. मेरिट लिस्ट ही या परीक्षेच्या स्कोअर वर ठरवली जाणार आहे. जेईई मेन्स नंतर पात्र विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देऊन आपलं इंजिनियरिंग कॉलेज मधील स्थान पक्कं करण्यासाठी पर्यतन करत असतो.