JEE Advanced 2021: 3 जुलै 2021 रोजी होणार जेईई ऍडव्हान्स परीक्षा; IIT Kharagpur करणार आयोजित 

मागील वर्षी आयआयटी दिल्लीने जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेतली होती. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) देशभरातील अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते, तर जेईई ऍडव्हान्स परीक्षा केवळ भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते

Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Minister of Education Ramesh Pokhriyal Nishank) यांनी जेईई ऍडव्हान्स 2021 (JEE Advanced 2021) ची तारीख जाहीर केली आहे. या वर्षी 3 जुलै 2021 रोजी जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेण्यात येणार आहे. या वेळी आयआयटी खडगपूर जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेईल. याबरोबरच शिक्षणमंत्र्यांनी विविध भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) प्रवेशासाठी प्रक्रिया आणि पात्रतेशी संबंधित माहिती देखील शेअर केली आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 75 टक्के पात्रता निकषही रद्दबातल केले असल्याची माहिती दिली. जेईई ऍडव्हान्स परीक्षेची तारीख सहसा सप्टेंबरमध्ये जाहीर केली जाते आणि जेईई ऍडव्हान्स परीक्षा मेमध्ये घेतली जाते.

यावर्षी कोरोना व्हायरसमुळे जेईई ऍडव्हान्स परीक्षा 2021 ची तारीख उशिरा जाहीर केली आहे. मागील वर्षी आयआयटी दिल्लीने जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेतली होती. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) देशभरातील अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते, तर जेईई ऍडव्हान्स परीक्षा केवळ भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. जेईई ऍडव्हान्स परीक्षेस बसण्यासाठी उमेदवारांना जेईई मेन क्लिअर करावे लागते. मात्र, कोविड-19 साथीच्या प्रभावामुळे जेईई ऍडव्हान्स 2021 मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. (हेही वाचा: 11 वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या विशेष फेरी अखेर 3,14,569 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित; 8 जानेवारी रोजी संपणार दुसऱ्या विशेष फेरीचे प्रवेश)

जेईई मेन 2020 उत्तीर्ण झालेल्या अशा विद्यार्थ्यांना थेट जेईई ऍडव्हान्स 2021 मध्ये बसण्याची परवानगी सरकारने दिली आहे, जे कोरोनामुळे जेईई ऍडव्हान्स देऊ शकले नव्हते. दरम्यान, जेईई ऍडव्हान्स परीक्षेतून देशातील प्रतिष्ठित 23 आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. दरम्यान, गेल्या महिन्यातच, शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले की 2021 पासून जेईई मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्यात येईल. चार सत्रे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येतील. जेईई मेन्स परीक्षेचे पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घेण्यात येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif